शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचा कार्य अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांना सादर
परतुर/( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण
आर्ट ऑफ लिव्हीग चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत वाटूर येथे गुरुवारी शेतकरी मेळावा संपन्न झाला याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सावंत, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर ,माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर व युवा सेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अभिमन्यु खोतकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी त्यांच्या कार्याचा अहवाल पुस्तीका मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सादर केला असता मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्य अहवाल पुस्तिका पाहून जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचे कौतुक केले व केलेल्या विकास कामाची व अग्रवाल यांच्या हातून घडलेल्या सामाजिक उपक्रमाची स्तुती करून अग्रवाल यांना पुढील कामास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जालना जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.