समर्थ विद्यालयात बाल चेतणा शिबीर.
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
पाटोदा [ माव ] आर्ट आॕफ लिव्हींग परीवार व श्री समर्थ माध्यमिक विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल चेतणा शिबीराचे आयोजण करण्यात आले आहे.
निर्व्यसणी - चारित्र्य संपन्न तसेच मानसिक व शारिरीक दृष्टीने सक्षम युवक हीच खरी कुटूंबाची व राष्ट्राची संपत्ती असते. असे युवक तयार होण्याची सुरुवात बाल चेतणा शिबीरात होते म्हणुनच श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात या शिबीराचे आयोजण करण्यात आल्याचे मुख्याध्यापक श्री सुरेश पाटोदकर यांनी सांगितले .
हे शिबीर चार दिवस चालणार असुण शिबीरास मुख्य शिक्षक म्हणुन श्री डिगांबर बोराडे , रामेश्वर जगदाळे , हरी बरकुले हे मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यालयाचे शिक्षक पाराजी रोकडे - ऊध्दव खवल - गणेश वखरे आणि कर्मचारी सहभागी झालेले आहेत.
आमदार श्री बबनरावजी लोणीकर यांनी या ऊपक्रमाचे कौतुक करुण शुभेच्छा दिल्या आहेत.
मोठ्या संख्येने विद्यार्थी शिबीरात सहभागी झालेले आहेत.