भारतीय संस्कृतीची शाश्वत मूल्ये रामायणात -हभप ढोक महाराज,मा.आ.सुरेशकुमार जेथलिया आयोजित रामकथेस भाविकांची मोठ्या संख्येने उपस्तिथी.



परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण
     रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली असून, प्रभाव संपूर्ण जगात पसरला आहे. प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा परमोच्च, उत्तुंग आदर्श म्हणजे श्रीप्रभू रामचंद्र आहेत.
आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श पती,या विविध गुण समुच्चयाचे सांस्कृतिक प्रतीक असणाऱ्या रामाला म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जात असल्याचे त्रेतायुगात श्रीविष्णू आपला सातवा रामवतार धारण केला. राम हा विष्णूचा अवतार होता, त्याचप्रमाणे राम पत्नी सीता ही लक्ष्मी देवीचा अंश होती, असे मानले जाते. देवाचा अवतार असूनही रामाला वनवास चुकला नाही. सीताही रामासोबत चौदा वर्षे वनवासाला गेली. मात्र, वनवासाची काही वर्षेच शिल्लक राहिली असताना रावण सीताहरण करतो असे रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी सांगितले मा आ. सुरेशकुमार जेथलिया व परिवाराच्या वतीने आयोजित रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून सांगितल्या जाणार्‍या श्रीरामकथा सोहळ्याच्या पाचव्या दिवशी सीताहरण कथा ऐकण्यासाठी भाविकांनी परतूर शहरातील भंडारी कपाउंड अयोध्या नगरीत गर्दी केली होती.

        ह.भ.प. रामराव महाराज ढोक म्हणाले की,राम काळात खर्‍या अर्थाने सामाजिक समरसता होती जातीपातीचे लवलेश ही कोणाच्या मनात नव्हता.अयोध्येतून राम वनवासात जातात तेव्हा शोकाकुल झालेली अयोध्या नगरी, राजा दशरथाची केविलवाणी अवस्था, श्रावण बाळाच्या आई वडीलांची आठवण, दशरथ राजाचा अंत्यविधी, शूर्पनखा वध, सीताहारण,जटायू पक्षाची लढाई करुन स्त्री रक्षणाची जबाबदारीचे महत्व विशद करुन आपण जर मानव आहोत आपल्या देशातील माता बहीणीचे रक्षण करा त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी निर्मल करा हीच खरी भाऊबीज असेल असे रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी सांगितले.रामायण म्हणजे आदर्श जीवनप्रणाली आहे. पितृ भक्ती कशी असावी, हे रामाकडे पाहून कळतं, त्याग कसा असावा हे भरतामध्ये पाहायला मिळतं. बंधुप्रेम कसं असावं हे लक्ष्मणाच्या रूपाने दिसून येतं. राम हा केवळ आदर्श पुत्र नव्हता तर तो आदर्श पती, भाऊ, शिष्य, मित्रही होता. इतकंच नाही तर तो आदर्श शत्रूही होता. रामाच्या इतर गुणांच्या खूप कथा ऐकायला मिळतात. मात्र शत्रूचाही रामावर विश्वास होता. रामायणात आपण नेहमी ऐकलेल्या कथांपेक्षा रामायणातील अनेक विलक्षण प्रसंग आणि त्यातील तत्त्वज्ञानाची उकल ढोक महाराज मोठ्या खुबीने करतात.

 

        दरम्यान कथेच्या सुरवातीला मा.आ.सुरेशकुमार जेथलिया ,मा.नगरध्यक्षा विमलताई जेथलिया व समस्त जेथलिया परिवाराच्या वतिने आरती करण्यात आली. तर आज सांगतेच्या आरतीच्या वेळी जेथलिया परिवारासह संजू सेठ छल्लानी, सुरेशजी पाटोटकर, संजय पवार, पंडितराव अंभोरे, तुकाराम ढवळे, भुजंगराव बरकुले, लक्ष्मीकांतराव हतवणकर, विठ्ठल कुलकर्णी,संपतराव सोळंके, रामजी कदम, राजेभाऊ जगदाळे, गोविंदराव साकळकर, मापरी साहेब, महिला कामगार सेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्षक सौ. सारिकाताई वरनकर,मंठा महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा सौ. अर्चना राऊत,रामभाऊ अंभोरे, पुंजाराम जी सुरूंग, सुभाषराव सवणे, सखाराम काकडे, बळीरामजी कडपे, दत्तात्रय कदम,आबासाहेब सोळंके, भरतराव अंभोरे, विठ्ठलराव मातने, भास्करराव सोळंके, अशोकराव तनपुरे, विलास शिंदे, ऍड.एम.बी कुलकर्णी, लालचंद मालपाणी, अरुण साबळे, सुभाष सकलेचा, सुभाष अग्रवाल,गुलाबराव पाटील काळे, मधुकर झरेकर सरपंच हातळी यांच्या सह पंचक्रोशीतील नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.
 सांयकाळी याच ठिकाणी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे नेवासा,यांचे किर्तन पार पडले यावेळी मोठया संखेने महिला पुरुष भक्तांची उपस्थीती होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....