एखादा महात्मा असेल तर त्याचा आदर्श घेऊन अनेक महात्मे जन्माला येण्याची शक्यता- हभप योगिराज गोसावी
तळणी : परीसरात एखादा महात्मा असेल तर त्याचा आदर्श घेऊन अनेक महात्मे जन्माला येण्याची शक्यता असते म्हणून एक महात्मा स्वःत च्या स्वार्थासाठी काही करतो असे नाही तर त्याचे सपूर्ण आयुष्य हे समाजासाठी धर्मासाठी असते असे प्रतिपादन श्री संत शाती ब्रम्ह एकनाथ महाराज यांचे वंशंज ह भ प योगीराज महाराज गोसावी यानी तळणी येथे दुसऱ्या दिवशीचे किर्तन प्रसगी केले
संत एकनाथ महाराज याच्या
करा रे बापानो साधन हरीचे
झणी करणीचे करू नका ॥१॥
जेणे नये जन्म यमाची यात
ऐसिया साधका करा काही ॥२॥
या अंभगावर निरुपण केले
संतांनी समाजाकडे बघीतल्या नंतर एक विषिन्नता संत महात्माच्या अंतकरणात तयार होत असते तेव्हा आपण समाजासाठी काही तरी केले पाहीजे समाजासाठी आपण काही देणे लागतो असा भाव त्यांच्या अंतकरणात तयार होऊन . अज्ञानी लावावे सन्मार्गी बुडते हे जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणोनिया अशा भावनेने अशी महात्मे पूढे येत असतात वारकरी सप्रंदायामध्ये टप्याटप्याने सर्वत्र एक ना एक महात्मा समोर आलेला आहे आणि त्यानी समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविला आहे
संत एकनाथ महाराज यांच्या हरीपाठातील या अभंगातून महाराजानी भगवतांचे नाव कोणी घ्यावे का घ्यावे कशासाठी घ्यावे घेतले तर त्याचा फायदा काय नाही घेतले तर नुकसान काय आदी सगळ्या गोष्टीचा विचार संत एकनाथानी त्याच्या हरीपाठातून मांडला आहे नाथ महाराज जेव्हा हरीपाठाच्या अंभगांचा विचार माडतात किवा मार्गदर्शन करतात तेव्हा त्यांच्यासमोर कुठला तरी एक व्यक्ती आहे असे आपल्याला धरुन चालनार नाही उपदेशात्मक अभग जेव्हा असतात त्या वेळी काही प्रकार घडत असतात त्यातील पहिला प्रकार एखाद्या माणसाला केलेला उपदेश स्वतञतेने केलेला असतो काही उपदेश सर्वसमावेशक असतात . काही गोष्टी अशा असतात त्या कोणालाच सागायच्या नसतात काही गोष्टी अशा असतात काहीना . सागायच्या असतात आणि काहीना सागायच्या नसतात आणि अशाही काही गोष्टी आहेत की ज्या सगळ्याना सागायच्या असतात आणि काही गोष्टी अशा पण असतात ज्या की सगळ्याना सांगायाच्या ही नसतात खोट बोलणे कोणाला सागायचे . नसते असत्य बोलायला कोणी सांगायचे नसते मनुष्याने नेहमी सत्य बोलले पाहीजे आपले शास्त्र आपल्याला सत्य बोलायला शिकवते . सत्यम ग्रहया ग्रमम ग्रहया मानसाने सत्य बोलले पाहीजे परतू चांगल्या शब्दाच्या वेषष्टानेमध्ये समोर आणले पाहीजे अगदी सामान्य भाषेत सांगायचे झाले तर एखादा मनुष्य टकला आहे त्याला टक्कल पडले असे म्हंटल्या पेक्षा तुमचे केस जास्तच गळतात अस म्हंटले तर बर वाटते
[माणसाने सत्य बोलावे पण प्रीय बोलावे आपले शास्र एवढे प्रगत आहे की जगाच्या पाठीवर कुठलेच शास्त्र प्रगत नाही नासामध्ये अनेक खगोल शास्त्रज्ञ आहेत आकाशामध्ये कोणता तारा कोठे गेला सुर्यादय झाला सुर्यास्त झाला कुठले ग्रहण कधी लागणार अंतरांतल्या अनेक बाबीच्या सशोधनासाठी अरबो रुपये नासा खर्च करते पण तोच अभ्यास तेच ज्ञान माहीती आपले भारतीय पंचाग किती तरी काळापासून आपल्या पर्यन्त कमीत कमी किमती मध्य आपल्या पर्यन्त पोहचवते ते ज्ञान आपल्या साठी महत्वाचे आपले शास्ञज्ञ आपल्या धर्माची ती कृपा आहे
मनुष्याने स्वःतकडे बघण्याचा दुष्टीकोन बदलला पाहीजे मनुष्याला अप्रिय वाटणारे असत्य बोलायला नको खोट बोलणे दुष्कत्य करणे हे कोणालाही सागांयचे नसते लग्न करणे आपण नपूसकांना सागू शकत नाही जो आपल्या कृटुबाची गरज भागवू शकत नाही जो सन्याशी आहे जो ब्रम्हचारी आहे अशाना आपन लग्न कर म्हणू शकत नाही आपण फक्त परमार्थ प्रत्येकाने करावा अशे माञ आपण सगळ्यांना सागू शकतो माञ आपण त्याकडे दुर्लक्ष करतो परमार्थ करा असे आपण प्रत्येकाला सांगू शकतो तुकोबाराय दारोदार फिरून सागतात परमार्थ करा म्हणून एखाद्या भाजीवाल्यान गल्लीबोळात जाऊन भाजी घ्या भाजी म्हणाव तस तुकोबाराय प्रत्येकाच्या घरी जाऊन सागतात देव घ्या कोनी आयता आला घर पूसोनी तुम्ही आम्ही कर्म दरिद्री देव न लगे देव न लगे आठवणीचे रुदले जागे ज्याच्या मध्ये परमात्माला साठवायचे आहे ती जागाच रिकामी आहे विकारानी भरली आहे त्या ठिकाणी परमात्मा येऊ शकत नाही ह्दयाशिवाय तो कोठेच राहु शकत नाही बसू शकत नाही आम्ही घालू बळीवंत तुज घालू ह्दयात परमात्माचे स्थान हे फक्त ह्दय आहे तो तेथेच राहू शकतो त्यासाठी माणसाने ह्दय स्वच्छ ठेवले पाहीजे खाण्याच्या वस्तू आपण स्वच्छ डब्यामध्ये ठेवतो मग त्याला ठेवण्यासाठी आपले ह्दय का स्वच्छ ठेऊ शकत नाही परतू आमचे ह्दय आमचे अतःकरण हे विकाराने भरलेले आहे बुजले आहे ते स्वच्छ करा म्हणजे देव तेथे वास करेल बुजलेल्या अतंकरणात देवाला राहण्याच स्थान नाही ते स्थान निर्मान करण्यासाठी मनातील अतंकरणातील घाण काढून टाका तर देव तेथे वास करेल