चार वर्षापासून रखडलेल्या परतूरच्या सिंचन विहिरीचा प्रश्न मार्गी लागणार- ना.संदिपान भुमरे,पत्रकार रशीद बागवान यांनी मांडली शेतकऱ्यांची कैफियत


    परतूर/ प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
      महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांशी योजना असलेल्या अहिल्याबाई होळकर सिंचन विहीर योजनेला जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात गाळबोट लागले असून गेल्या चार वर्षापासून ही योजना तालुक्यात बंद पडली आहे. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त विहिरीचे वाटप झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेत गोंधळ करण्यात आला होता. मात्र आता याचा आधार घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी ही योजना तब्बल चार वर्षापासून बंद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत.आज राज्याचे रोहयोमंत्री ना.संदिपान भुमरे हे परतुर दौऱ्यावर आले असताना पत्रकार संघाच्यावतीने रशीद बागवान यांच्यासह अनेकांनी तालुक्यातील विहिरींचा विषय मांडला असता ना.भुमरे यांनी त्यासंबंधी जिल्हास्तरीय बैठक घेऊन तात्काळ ही योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले.यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
        याबाबत सविस्तर वृत्त असे की जिल्ह्यात चालू असलेली अहिल्याबाई होळकर धडक विहीर योजना मात्र परतूर तालुक्यात तब्बल चार वर्षा पासून बंद का असा खडा सवाल रोहीयोमंत्री ना संदिपान भुमरे यांना विचारला असता त्यांनी संबंधित जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांना या विहिरी तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात येईल तसेच शेतकऱ्यांचे उसासह धान्य घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. यासाठी माझ्या खात्यामार्फत प्रत्येक गाव तांड्यावर मी पानंद रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे यावेळी सांगितले. हाही प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची आश्वासन यावेळी ना.भुमरे यांनी दिले. यावेळी त्यांनी.मा आ सुरेशकुमार जेथलिया यांच्या वतीने आयोजित रामकथे ला आज दिनांक 11 रोजी उपस्थिती दर्शवली असता, वरील योजने बाबत शेतकाऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याची कैफियत पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार रशीद बागवान यांनी मांडली सदरील योजने बाबत गेल्या चार वर्षापूर्वी तत्कालीन पंचायत समिती परतूरचे गटविकास अधिकारी यांनी मंजुरी वितरिक्त अतिरिक्त विहिरींना मंजुरी दिली होती, याचा ठपका ठेवत त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते, तेव्हा पासून ही योजना बंद असल्याने याचे लाभधारक शेतकरी हवाल दिल झाले होते, या बाबत जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर यांनी या विहिरी च्या प्रश्नाबाबत शेतकऱ्याना सोबत घेत जिल्हा परिषदेवर प्रचंड मोर्चा काढला होता. मात्र तरीही चार वर्षे उलटून ही योजना बंद असून यामुळे शेतकऱ्यांना याचा कुठलाच लाभ मिळत नसल्याची खंत बागवान यांनी रोहीयोमंत्री ना.भुमरे यांच्या समोर व्यक्त केली असता, तातडीने ना.भुमरे यांनी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मीना वर्षा यांना मोबाईलवर संपर्क केला व सदरील योजनेचा पाठपुरावा करत ही चालू करण्याची त्यांनी सूचना केली या मुळे चार वर्षांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश