चोरट्यांचा पाठलाग करून पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले,परतूर पोलिस आणि चोरट्यांचा मसाला शिवारात अंधार्‍या रात्री थरार

परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण
 पोलिस चोरांचा पाठलाग करून चोरट्यांना पकडत असल्याचे सिनेमात अनेकदा पाहिले आहे. मात्र परतूर पोलिसांनी सिनेमातील हकीकत सत्य घटनेत उतरवून दाखवीले
 याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही दिवसापासून टाटा सोलर प्लांट येथे चोरीच्या घटना घडत आहे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी शंकर गोपीनाथ जईद (सेक्युरीटी गार्ड सोलर प्लॉन्ट मसला) यांनी फिर्याद दिली की नेहमी प्रमाणे रात्र पााळीवर असतांना दिनांक 22 फेब्रुवारी रात्री साडे बारा ते एक वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम हे सोलार प्लांटमध्ये केबल चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले  बॅटरीच्या  उजेडात केबल कापताना दिसून आले. त्यांनी जोरात ओरडुन आवाज दिला असता तोडलेले केबल जागेवरच टाकुन चोरट्यांनी पळ काढला. त्या अनुषंगाने परतुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामसुंदर  कैठाळे   यांनी पथक स्थापन केले व चोरांच्या मुस्क्या आवळण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या दिनांक 23 फेब्रुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पोकॉ गजानन राठोड यांना गुप्त माहितीगारा कडून माहिती मिळाली की मसाला शिवारातील प्लांट मध्ये तीन चार इसम प्लांट मध्ये घुसून वायर चोरी करत आहे तदनंतर पोका राठोड यांनी तात्काळ याबाबत पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांना माहिती दिली व लगेच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना पवार,गजानन राठोड अमोल गायकवाड अचित चव्हाण शाम्युअल गायकवाड दशरथ गोपणवाड परमेश्वर माने होमगार्ड बेरगुडे, काकडे, ठाकूर यांनी सदर ठिकाणी सापळा रचला काही वेळाने चोरट्यांना पोलिसांनी घेरले असल्याचे समजताच चोरट्यानी पळ काढला पोलिसांनी जीवाची पर्वा नकारता त्यांचा पाठलाग सुरु केला चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळत असताना पोलिसांनी झडप घालून गोविंद लड्डू काळे, सुनील सुजान काळे राहणार परतुर व अनुप गोडाजी चव्हाण राहणार औरंगाबाद यांना पकडून त्याच्याकडील मुद्देमाल हस्तगत करून अटक करून न्यायालयासमोर गुरुवारी हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती परतुर पोलिसांनी दिली या कारवाईने पोलिसांनी केलेल्या कामगिरी चे कौतुक होत आहे पुढील तपास पोहेका इस्माईल शेख हे करीत आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड