सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सिमेंट काँक्रीट रस्ता केल्यामुळे मोहन अग्रवाल यांचा केला सत्कार, परतूर शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही- जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल



परतुर /(प्रतिनिधी ) कैलाश चव्हाण
    परतूर शहरातील राजे संभाजी नगरातील नागरिकांनी वारंवार शासन दरबारी सिमेंट रस्त्याची मागणी केली असता त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते गेल्या पंचवीस वर्षापासून कोणत्याही प्रतिनिधीने राजे संभाजीनगर मधील रस्त्याची मागणी पूर्ण केली नाही सतच्या धुळीच्या लोळामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मोहन अग्रवाल यांच्याकडे सदरील रस्त्या विषयी कैफियत मांडली असता जिल्हाप्रमुख अग्रवाल यांच्या प्रयत्नाने सिमेंट काँक्रीट रस्ता पूर्ण झाला. राजे संभाजीनगर परिसरात विद्युत खांब व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व काँक्रीट नाली लवकरात लवकर करण्यात येईल असेही तेथील नागरिकांना अग्रवाल यांनी आश्वासन दिले. सिमेंट रस्त्याचा , दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी येथोचित अग्रवाल यांचा सत्कार केला. यावेळी प्रा. डॉ. पंडित गाते ,प्रा. डॉ. सखाराम टकले, प्रा. बद्रीनाथ बिडवे ,प्रा. डॉ. विनायक काळे, विष्णू नाना कदम ,प्रा. मदन सुरूंग ,सुदर्शन पांगरकर ,प्रा. डॉ. श्यामसुंदर विजय चव्हाण, प्रा. डॉ. पांडुरंग नवल, संतोष काळे, काशीराम सवणे, आबासाहेब गाडेकर ,प्रा डॉ. महेश चौधरी, गणेशराव बोराडे, विष्णु शिंदे, उद्धव चौधरी व लक्ष्मणराव काळे आदीने अग्रवाल यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला या अगोदर अग्रवाल यांच्या प्रयत्ना मुळे परतूर शहरासाठी कोट्यावधीचे विकास कामे मंजूर असून काही कामे प्रगतीपथावर आहेत.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत