संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो; म्हणून चांगल्या विचारांच्या माणसाची संगत धरावी- ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघाळेकर

तळणी प्रतिनीधी रवी पाटील
मंठा तालूक्यातील तळणी येथे संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमीत्य गेल्या सात दिवसापासून चालू असलेल्या अंखड हरिनाम सप्ताहची सांगता ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाघाळेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली ज्ञानेश्वर महाराज याच्या नेतृत्वाखाली गेले सात दिवस भागवत कथा हरी किर्तन काकडा आरती आदी धार्मीक कार्यक्रमाची रेलचेल श्री संत गजानन महाराज संस्था येथे दिसून आली 

या काल्याच्या प्रसगी कंठी धरला कृष्ण मणी अवघा जणी प्रकाशला काला वाटू ऐकमेका वैष्णव निका सभ्रम या जगदगूरू तूकाराम महाराज याच्या अंभगावर निरुपण केले 

प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते, हे ज्याप्रमाणे संसारात, तसेच परमार्थतही लागू आहे. संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो; म्हणून चांगल्या विचारांच्या माणसाची संगत धरावी. चांगलेवाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही. संताला ओळखायला आपल्या अंगी थोडेतरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. चुकीची वाट चालत असताना, 'अरे, तू वाट चुकलास,' अशी जागृती संतांनी आपल्याला दिली. तेंव्हा, जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुनः चालू लागलो, तर आपण योग्य स्थळी जाऊ. संताचे कार्य समाजासाठी एक दिशा देणारे असते त्या दिशेवर आपले .मार्गक्रमण असले पाहीजे संताची ओळख ही त्याचा समाजाप्रती धर्माप्रती असलेला त्याग . त्याचे समर्पण त्यानी दाखवीलेला भक्ती मार्ग विना द्वेष भावना ही ओळख संतांची असते त्या मार्गावर मार्गक्रमण करणे हे मनुष्याचे आद्यकर्तव्य आहे भक्ती मार्ग स्वीकारला तर मनुष्य जीवनाचे सार्थक झाले समजा श्री संत गजानन महाराजानी आपल्याला भक्ती मार्ग शिकवला अवलिया संत कधीच आपली ओळख सागत नाही या संतांना ओळखणे सर्वसामान्य माणसाचे काम नाही पण बंकटलाल दामोदर सारख्यानी गजानन महाराज यांचे महात्मे कळांले म्हणून त्या भक्तांची ओळख सुध्दा संतंपदापर्यत गेली कारण गजानन महाराज यानी दाखवलेला भक्ती मार्ग त्यानी स्वीकारला म्हणुन त्याचा उध्दार झाला . तोच भक्ती मार्ग तुम्ही आम्ही स्वीकारला तर आपला उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही 

या काल्याच्या प्रसगी कृष्णचारिञाचे धावते वर्णन केले गोपीकेची असलेली कृष्ण भक्ती त्याना कृष्णमय करुन गेल्या देवाच्या खोडकर नटखट लिला सुध्दा गोपीकांना कधीच नकोश्या होत्या कृष्णाला भेटण्याची संधी त्या गोपीका शोधत असत कृष्णाच्या वैभवाचा आनंद गोपीका घेत असत रासक्रीडेतून वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुभव कृष्ण गोपीकेला व संव गडयाला देत असत कृष्णाचे चरिञ एक त्यागाचे चरित्र आहे कृष्ण चरीञाचा अभ्यास मनुष्याने केला पाहीजे चराचरामध्ये तो विसावला आहे हे पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हा आम्हाला गोपिकेसारखे कृष्णमय व्हावे लागेल भगवान कृष्णाचे गाईवर नितांत प्रेम होते प्रत्येकाने आपल्या घरी एका गाईचा सांभाळ केला पाहीजे सनातन हिदू धर्मात गाईचे मोठे महत्व आहे सध्या ती गाय संकटात आहे तीचा सांभाळ करा नक्कीच भगवान कृष्ण परमात्मा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहनार नाही 

महाप्रसदाना सांगता प्रकट दिनाच्या निमित्य दहा हजार भावीकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तळणी परीसरात गजानन महाराज यांचे मोठे मंदीर असल्याने भावीकांची मांदीयाळी या वेळी दिसून आली

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....