वाटुर फाटा येथे बस चे चालक वाहक चा सत्कार
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
पोहरादेवी हे बंजारा समाजाची काशी असून तिथपर्यंत परतूर ते पोहरादेवी बस सेवा सुरू सेवा चालू झाल्यामुळे बंजारा समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून वाटूर फाटा येथे बंजारा समाजाच्या वतीने फटाके फोडून व परतूर ते पोहरादेवी बस चे चालक व वाहक यांचा सत्कार करून आनंदोत्सव साजरा केला
या प्रसंगी वाटूर फाटा व पंचक्रोशीतील बंजारा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती मोहन आडे,गुलखंड तांडा चे सरपंच विष्णू आडे उपसरपंच भीमराव राठोड ,माजी सभापती रावसाहेब राठोड,वाटूर तांडा सरपंच सुरेश आडे, लहू आडे वाटूर,रामेश्वर राठोड वाटूर, माधव राठोड व इतर बंजारा समाजातील नागरिक यांनी उपस्थित राहून व पेढे वाटून आनंद साजरा केला