भाजपा -शिवसेनेतर्फे 30 पासून राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची माहिती ,स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी काढण्यात येणार गौरव यात्रा

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री दत्ता आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली. ही यात्रा ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
    राहुल गांधी व काँग्रेस च्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही आ. बबनराव लोणीकर यांनी दिले.

 राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा - शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. 

 उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती, असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकरयांनी नमूद केले.
 
 या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे यावेळी बोलताना ते म्हणाले
 . पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की ज्या सावरकरांनी मरण यातना भोगल्या काळ्यापाण्याची शिक्षा भोगली अशा स्वातंत्र्यवीराविषयी काहीही बरंळने योग्य नाही ही आपली संस्कृती नसून युवा पिढीला स्वातंत्र्यवीराचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देण्यासाठी दिनाक 05 एप्रिल 2023 रोजी परतूर येथे ही गौरव यात्रा आयोजित केली असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी