लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयायात मानव विकास अंतर्गत 88 मुलींना सायकल चे वाटप

परतूर ता.27 प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
    परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयाय मानव विकास अंतर्गत 88 मुलींना सायकल चे वाटप संस्थेचे सचिव कपिल आकात यांच्या हस्ते दि.25 रोजी करण्यात आले. या वेळी पोलीस निरक्षक शामसुंदर कौठाळे, माजी नगराध्यक्ष विनायक काळे प्रा. डॉ. भारत खंदारे, विलास पौळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
    ग्रामीण भागातील मुलींची पायपीट थांबावी व मुलींना वेळेवर शाळेत पोहचून ज्ञान ग्रहण करता यावे यासाठी केंद्रशासनाकडून इयत्ता आठवी च्या मुलींना मानव विकास अंतर्गत मोफत सायकलीचे वाटप करण्यात येते. या अनुषंगाने लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयातील 88मुलींना सायकालीचे वाटप करण्यात आले. या वेळी अंकुश तेलगड, विजय राखे, अखिल काजी, सचिन खरात,इजरान कुरेशी, शबीर शैख, संदीप वाघ,भालेराव सर, इसरार खतीब, मुख्यध्यापक संजय जाधव, रामराव घुगे, श्याम कबाडी, कैलास खंदारे, रामप्रसाद नवल, अनिल काळे, सुरेश मसलकर, सचिन कांगणे, बळीराम नवल, श्रीमती व्रदा डक, श्रीमती स्वरा देशपांडे, सुभाष बरकूले, राजाभाऊ वडेकर आदी उपस्थित होते. कार्यकामाचे सूत्र संचालन योगेश बरिदे यांनी केले तर आभार अनिल काळे यांनी मानले. 

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.