आज काल गळ्यात माळ घातली का त्याला ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्याचा आव येतो व त्याला वाटते की आपण ज्ञानी झालो -हभप चांगदेव महाराज काकडे कंडारीकर
तळणी प्रतीनिधी रवी पाटील
मंठा तालुक्यातील कानडी येथे नाथ षष्टी निमीत्य चालू असलेल्या अखड हरीनाम सप्ताह मध्ये ह भ प चांगदेव महाराज काकडे कंडारीकर याची किर्तन सेवा झाली अवघेची ञेलौकी आनंदाची आता चरणी जगननाथा चित्त ठेले माय जगन नाथ बाप जगन्न नाथ अनाथाचा नाथ जनार्धन एका जनार्धनी एकपण उभा चैतन्याची शोभा शोभलीसे या अंभगावर निरूपण केले एकनाथ महाराज याच्या नाथषष्टीच्या निमीत्याने श्री कानीफनाथ महाराज सस्थांन मध्ये सालाबाद या सप्ताहचे आयोजन करण्यात येते एकनाथ महाराज हे मुळ नक्षञावरचे होते त्याचा जन्म होताच त्याचे आई वडील गेले त्यांचा सांभाळ आजी आजोबांनी केला नाथ महाराजाची दत्त परपरा होती एकनाथ महाराज हे अवतारीक पूरुष होते लहानपणापासून परमार्थाची आवड होती भानुदासाच्या कुळी महाविष्णुचा अवतार नाथ महाराज हे योगभ्रष्ट होते पूर्वजन्माची काही साधना करून घ्यायची शिलक असल्याने त्याना परत हा नरदेह धर्माच्या उथ्यानासाठी मिळाला म्हणून त्याला योग भ्रष्ट म्हणतात योग भ्रष्टाचा जन्म पवित्र आणि श्रीमंत कुळात होत असतो नाथ महाराज सुध्दा योग भ्रष्ट होते बालपणापासून त्याना असे वाटायचे की आपल्याला ब्रम्हज्ञान सागनारा महात्मा भेटावा नाथ महारंजाना अन्न वस्त्र निवार्याची चितां .नव्हती मला फक्त शुध्द ब्रम्हज्ञान . सागनारा भेटावा सध्यस्थितीत भेसळीचे ब्रम्हज्ञान . सागणार्याची यादी मोठी आहे घराघरात त्याचा वावर आहे मी म्हणनारे वारी न करणारे काकडा न करा नारे मीच देव म्हणून सांगणारे याची यादी मोठी आहे
देव म्हणूनी सांगसी लोका विषयाच्या सुखा टोकूनीया . घरोघरी अवधे झाले ब्रम्ह ज्ञान परीनेशी कोन बहुमानी पामराला जर ब्रम्हज्ञान प्राप्त झाले तर तो पामर होत असतो कोणालाही ब्रम्हज्ञान सांगु नये नरेदहातच ब्रम्हज्ञान प्राप्त होत असते कारण नरदेहाने तो अधिकार प्राप्त केलेला असतो जमीनीत पीक येत असते पण ती जमीन पीक येण्यासाठी योग्य बनवावी लागते जशी गोधनाकरिता मनोभूमी तयार करावी लागते निष्काम कर्म निस्काम उपासना त्याचे नामस्मरण झाले पाहीजे अतकरण शुध्द झाले पाहीजे तरच त्याला ब्रम्ह ज्ञान प्राप्त होईल आज काल गळ्यात माळ घातली का त्याला ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्याचा आव येतो व त्याला वाटते की आपण ज्ञानी झालो तसे होत नसते मनुष्य कधीच ज्ञानी होऊ शकत नाही ज्ञानोबा राय उपजच ज्ञानी होते ज्ञान हे वस्त्यार्याच्या धारी सारखे धारदार असते ज्ञान देणारा गुरु सर्वश्रेष्ठ आसावा श्रोती असावा ब्रम्हनीष्ठ असावा त्याचा शास्त्राचा अभ्यास असावा एखाद्या विषयांची शिष्याला शंका आली तर त्या .शंकेच निरसण करणारा असावा शिष्याला बोध करण्यासाठी तो दयाळू असावा तर तो गूरू योग्यतेचा अशा गुरुची अपेक्षा संत एकनाथाना होती शुध्द ब्रम्ह ज्ञान सागनारा गुरु असावा ज्ञानदेव म्हणे शुध्द ब्रम्हज्ञान पावलो हे खूण संत संगे जे ब्रम्हज्ञान सागतात तेच संत असतात नरदेह मिळून जर ब्रम्हज्ञान झाले नाही तर आपली पत ही गावातल्या गाढवा सारखी असेल कारण गाढवाला ब्रम्हज्ञान प्राप्त करण्यासाठी साधन नाही मनुष्याला साधन असून जर ब्रम्हज्ञान प्राप्त होत नसेल तर यात . गाढवाचा काय अपराध
आज आमची स्थिती कशी झाली आहे पाहा; प्रपंच आम्हाला सुटत नाही; भगवंताचे प्रेम आम्हाला पाहिजे; या प्रपंचावरचे प्रेम न सोडता आम्हाला भगवंताचे समाधान लाभावे अशी आमची इच्छा आहे. खरोखर, प्रपंचातले आमचे हे प्रेम व्यभिचारी आहे. प्रेम ही वस्तू अशी आहे, की ती एकाच ठिकाणी ठेवता येईल. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे आमचे प्रेम आम्हाला दोन ठिकाणी ठेवता येणार नाही. आमचे खरे सुख एका भगवंताजवळच आहे; आणि ते मिळविण्यासाठी आम्ही प्रपंच सोडायलाच पाहिजे असे नाही. प्रपंचात आम्हाला वाटणारी आसक्ती ही मुख्यतः नाहीशी झाली पाहिजे. शास्त्रातसुद्धा हेच सांगितले आहे. शास्त्र हे अनुभवाचे बनले आहे. आमचा अनुभव आम्ही शास्त्राबरोबर पडताळून पाहात नाही. प्रपंचाची खरी किंमत आम्हाला कळल्याशिवाय त्याच्याबद्दल वाटणारी आमची आसक्ती कमी होणार नाही. आज प्रपंचात सुख नाही हे अनुभवाला येऊनही त्याची आसक्ती आम्हाला सुटत नाही. ती आसक्ती सुटायला काय मार्ग आहे तो आम्ही पाहणे अगदी जरूर आहे. प्रपंचाची आम्हाला गरज किती आहे? एखादा मनुष्य फिरायला जाताना हातात काठी घेतो. त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे कोणी म्हणत नाही. त्याप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे. हा प्रपंच करीत असताना त्याची आसक्ती कमी होऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी, शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत, आणि त्यासाठी आपले आचार-विचार आणि उच्चार आम्ही सांभाळणे जरूर आहे. आपण आपल्या संस्कारांप्रमाणे वागलो तर निवृत्तिमध्येच जाऊ; कारण आपली प्रवृत्ती ही सर्व निवृत्तिपरच आहे यात संशय नाही. आता यापुढे आपण रामाच्या नावाने प्रपंचाचा धंदा करू या, म्हणजे नफातोटा त्याचाच होईल.
प्रपंचात सदाचाराने वागावे. सदाचार हा मूळ पाया आहे. नीतिधर्माचे आचरण असावे. नीतिधर्माची बंधने ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहेत. विचाराने अत्यंत पवित्र असावे. कोणाचा द्वेष, मत्सर करू नये, आणि दुसऱ्याचे अहित चिंतू नये. उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत. नेहमी सर्वांशी गोड बोलावे. ज्या जिभेने आपण भगवंताचे नाम घेतो, त्या जिभेने दुसऱ्याचे अंतःकरण कधीही न दुखावेल याची खबरदारी घ्या. अंतःकरण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंतालाच आपण दुखवीत असतो हे ध्यानात धरा.
प्रपंचातले आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे . तसे करण्यात समाधान आहे .