पक्ष बांधनीसाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कंबर कसुन कामाला लागावे -जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर


रिपब्लिकन सेनेची पक्ष कार्यालयात बैठक संपन्न
जालना (प्रतिनिधी) समाधान खरात 
    सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आणि आगामी काळातील निवडणुकांच्या पुर्वतयारीसाठी महाराष्ट्र अध्यक्ष सागर डबरासे यांच्या सुचनेवरून जालना जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या वतीने शुक्रवार दि. 17 मार्च रोजी पक्ष कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
यावेळी पु. जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने, महासचिव एक्स आर्मी चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक मच्छिंद्रआप्पा खरात, सिध्दार्थ पानवाले, महिला अध्यक्षा कांताबाई बोरूडे, युवक आघाडी अध्याक्षा पिया जैन, सर्जेराव आंभुरे, समाधान खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बैठकीमध्ये बोलतांना वाहुळकर म्हणाले की, काल झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, हरबरा आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच परभणी येथे होणारा रिपब्लिकन सेनेचा स्वाभीमानी मेळावा दि. 25 मार्च रोजी होणार असून जालना जिल्ह्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. आगामी जि. प., पं. स., न. प. निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधनीच्या कामाला कंबर कसुन लागावे आणि गाव तेथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता असे ध्येय पदाधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवावे असे देखील त्यांनी यावेळी सांगीतले.
    यावेळी जिल्हा सचिव नवनाथ ठोके, जालना तालुकाध्यक्ष भिमराज खरात, अंबड तालुकाध्यक्ष गोरख आपुट, बदनापुर तालुकाध्यक्ष दादू गरबडे, परतुर तालुकाध्यक्ष जयपाल भालके, सोमाजी लहाने, मधुकर मस्के, शेख जब्बार, अनिल भालमोडे, जालना शहराध्यक्ष माया खिल्लारे, युवक जालना तालुका अध्यक्ष दिनेश वाहुळे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्के, बाळू गरबडे, संजय गरबडे, दादाभाऊ भालमोडे, प्रकाश हिवाळे, कैलास लहाने, कैलास भालके, वैभव खरात, अर्जुन म्हस्के, पंडित मस्के, इंदुबाई लहाने, शोभाबाई मस्के, गजानन भालमोडे, शांताबाई हिवाळे, चत्रभूज भालमोडे, संदीप उबाळे, बबनराव खरात, अशोक पवार, कारभारी आपुट, राहुल खरात आदींसह पदाधिकाऱ्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी रिपब्लिकन सेने वंचित आघाडी युतीचे नंदापूर येथील सरपंच दत्ता कुरधने आणि उपसरपंच रामदास खरात, सदस्य पुनम रविंद्र खरात, पानेगाव येथील ग्रा. प. सदस्य शाहूराव आपुट, सोसायटी सदस्य गोरख आपुट यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.