मनुष्याने भक्ती मार्ग स्वीकारावा -ह भ प विष्णू महाराज बादाड

तळणी रवी पाटिल
मनुष्याने भक्ती मार्ग स्वीकारावा जो की तुम्हा आमच्या उद्धाराचा मार्ग आहे तो मार्ग आपल्याला ज्ञानोबा तुकोबाने दिला ज्यानी वारकरी संप्रदायाचा पाया रचुन उध्दार करून घेतला ते ज्ञानोबा व ज्यानी त्याच पायावर उभारलेला कळस हे भक्ती मार्गाच्या प्रबळ इच्छेच ज्वलंत उदाहरण तुमच्या आमच्या समोरे असल्याचे . प्रतिपादण ह भ प विष्णू महाराज बादाड यानी कानडी येथे जगदगूरू . तुकाराम . महाराज बीजेच्या निमीत्य या किर्तन सेवेचे आयोजन ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले

जगदगुरू तुकाराम महाराज याच्या आपूलीया हीता जो असे जागता धन्य माता पिता तयाचीया . कुळी कन्या पूञ. होती जे सात्वीक तयाचा हरीक वाटे देवा या अंभगावर निरूपण केले संत हे तुमचा आमचा उध्दार करण्याकरीता या पूथ्वीतलावर अवतीर्ण होत असतात जगदगूरू तूकाराम महाराज हे सुध्दा तुमच्या आमच्या उद्धारासाठीच या पूथ्वीतलावर अवतीर्ण झाले आहे संत ज्ञानेश्वरानी ज्ञानेश्वरीच्या रूपाने एक अनमोल ठेवा आपल्याला . दिला आहे तर संत तुकारामांनी गाथा दिला आहे ज्या संसारीक मनुष्याच्या जिवनात ज्ञानेश्वरी व गाथा यांचा वावर आहे त्याना कुठल्याच गोष्टीची गरज पडणार नाही मनुष्य जीवनाचा आधार म्हणजेच गाथा आणि ज्ञानेश्वरी आहे त्या ग्रंथाचा आधार मनुष्याने जर घेतला तर त्याच्या जीवनाचा उध्दार झाल्याशिवाय राहणाऱ नाही 

आज काल मानवाची प्रवृती ही वरवर जाण्याची झाली आहे कोणीही कमीपणा घ्यायला तयार नाही अशा प्रवृती मूळे मनृष्याला समाधान मिळू शकत नाही तुकोबारायांना त्याच्या काळात किती त्रास सहन करावा लागला तरी सुध्दा त्रास देणाऱ्या प्रती त्याना .आदरच होता म्हणून त्याचे मोठेपण सिद्ध होते म्हनून ते भंगवतांला सुध्दा प्रिय होते अवध्या बेचाळीस वर्षाच्या आयुष्यात तुकोबारायांनी देवाच्या चितंना शिवाय दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही सतत चित्तन म्हणन करून आपल्या साठी पवीञ असा गाथा दिला त्याच गाथ्याच्या आधारावर आज हजारो किर्तनकार त्याच्या अंभ गातुन सबंध महाराष्ट्रातून वारकरी सप्रदायाची सेवा व सामाज जागृतीचे काम करत आहे 

कलयुगातील मनुष्याची व्रती ही अहकारी बनत चालली आहे अहकारी वृती ही मनुष्य जीवनासाठी घातक असुन त्या वृत्तीचा स्पर्श होऊ द्यायचा नसेल तर भक्ती मार्गावर चालणाऱ्याच्या मागे लागा त्यातच आपले हीत आहे तुकोबानी सुधा त्याच्या जीवनात विरोध असताना सुध्दा भक्ती . मार्ग सोडला नाही म्हणून त्याना वैकूठात घेऊन जाण्यासाठी स्वःत देवाला याव लागले त्याच्या भक्ती त्यानी त्याच्या सपूर्ण कुळाचा उध्दार करून घेतला तुम्हा आम्हाला जर सांसारीक जीवनात राहून सुध्दा उध्दार करायचा . असेल तर तुकोबारायांनी दाखवलेल्या भक्ती मार्गावर चालणे गरजेचे आहे 

तुकोबाच्या अंगी मोठेपण होते सांसारीक गरजा असताना सुद्धा त्या गरजेचा कधी स्पर्श त्यानी स्व : त होऊ दीला नाही त्या गरजा देवानेच पूर्ण केल्या प्रत्येक वेळी देवाने परीक्षा घेतली परतू प्रत्येक वेळी त्यानी त्यावर मात केली सध्याच्या युगात जरी आपण तुकोबारायांसारखी भक्ती करू शकलो नाही तरी थोडाफार प्रयत्न केला तरी आपला उध्दार झाल्या शिवाय राहणार नाही 

बुद्धीनेच आपण कर्म करतो ते जगामधे दुःख उत्पन्न करतं.हे दुःख नाहीसं करायला दोन मार्ग आहे 
 अगदी मुळापासून सुरूवात करायची - म्हणजे आकुंचितपणा उत्तम करणारी आपली वासना मारुन टाकायची.याला मीपणा जाळणं, अहंकार मारणं,शरण जाणं असं म्हणतात .
.अगदी वरच्या टोकापासून सुरुवात करायची - म्हणजे बुद्धी मधला घोटाळा नाहीसा करुन तिला स्वच्छ करीत बसायचं. याला आत्मानात्मविवेक, वेदांतविचार, ज्ञानमार्ग म्हणतात. भक्तीमधे हे दोन्ही मार्ग आहेत, म्हणून ती श्रेष्ठ आहे.भगवंताला शरण गेल्याशिवाय भक्तीला अस्तित्वच नाही आणि सत्संगतीमधे अहोरात्र आत्मानात्मविवेक होत असतो.

म्हणून संतानी दीलेला भक्ती मार्गच मनुष्य जीवनाच्या उद्धाराचे द्वार आहे जे की ज्ञानोबा तुकोबानी आपल्या दाखवले असल्याने त्याचा स्वीकार

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले