पोहरागड (पोहरादेवी) येथे बंजारा जनजागृती महा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा - अर्जून नायक

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   बंजारा समाजासह वंचित, उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड कामगार बांधवांची काशी समजल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र पोहरागड (पोहरादेवी) येथे दि. २९ मार्च रोजी अखिल भारतीय बंजारा जनजागृती महा मेळाव्याचे आयोजन सर्व संत महंतांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले आहे, तरी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बंजारा ब्रिगेड मराठवाडा संघटक अर्जुन नायक यांनी केले आहे. 
     या जनजागृती महा मेळाव्याला धर्मगुरु बाबुसिंग महाराज,महंत कबिरदास महाराज, महंत सुनिल महाराज, महंत रमेश महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत यशवंत महाराज, देवी - बापू भक्त महंत शेखर महाराज, महंत खुशाल महाराज यांच्यासह भारतभरातून येणाऱ्या संत महंत आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महामेळाव्याला बंजारा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड हे मार्गदर्शन करणार आहेत. 
        मागील अनेक वर्षापासून देश पातळीवरील अनेक समस्यांना बंजारा समाज तोंड देत असून त्याकडे कोणतेही शासन प्रशासन लक्ष द्यायला नसल्याने आता देशपातळीवर सामाजिक एकजुटीचा निर्णय घेण्याची वेळ आलेली असल्याने, भारतातील 15 ते 20 बंजारा समाजासह वंचित, उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड कामगार बांधवांची काशी असलेल्या पोहरादेवी (पोहरागड) येथे राष्ट्रव्यापी अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून या ठिकाणी 13 ते 14 राज्यातील लोकांची उपस्थिती राहणार आहे, तरी या ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील समाजबांधवांनी लाखोंच्या संख्येने महा मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन बंजारा ब्रिगेडचे मराठवाडा संघटक अर्जुन नायक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

तळणी : येथील कुस्ती स्पर्धला मोठा प्रतिसाद नववर्षाच्या दिवशी लाखो रुपयाची उधळण