उस्वद येथे अंखंड हरीनाम सप्ताह मधे शिवमहापूराणाचे आयोजन

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
   येथून जवळच असलेल्या उस्वद येथे चालू असललेल्या अंखंड हरीनाम सप्ताह मधे शिवमहापूराणाचे आयोजन करण्यात आले कथेच्या दुसऱ्या दिवशी महाराजानी शिव महापूराणातील अनेक दाखले देऊन मञ मुग्ध केले 

मनुष्याने त्याच्या आयुष्यात शिवभक्तीचे अनुष्ठान केले पाहीजे शिव आराधना मनुष्याच्या सांसारीक आयुष्यातील एक गरज असली पाहीजे सध्या शिवाची उपासना मोठया प्रमाणात चालू आहे शिव आपल्या सगळ्यांची आराध्य दैवत असून या शिवाच्या साधनेत सगळ्या देवी देवतांचे पूजन व त्या सगळ्यांची आराधना होत असते भवरोगापासून मनुष्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर त्याने शिवसाधनेची कास धरणे गरजे आहे भवरोगाची मुक्ती करण्यासाठीच आपण या शिव महापूराण कथेच्या दरबारात बसलो आहे प्रतेक मनुष्या जीवनात काही ना काही दुःख हे आहेच ते दुःख नाहीसे करायचे असेल तर शिवनामस्मरणाचा स्वीकार मनुष्याला करावाच लागेल तरच त्याला त्याच्या प्रांपचीक आयुष्यात सुखाची प्राप्ती झाल्याचा अनुभव येणार नाही 

बाष्कल नावाचाबिदूंक नावाच्या राजाच्या पत्नी चंचूंला बिंदूक नावाचा राजा हा साधू वृत्तीने त्याचा राज्यकारभार चालवत असे तो राजा साधूवृत्तीने तोपर्यन्त राहीला जोपर्यन्त त्याच्या जीवनात कूंसगती आली नाही पण त्याच्या जीवनात वाईट संगती आली कुसगती करायला लागला वाईट संगती करायला लागला त्या वाईट संगतीच्या वागण्यामुळे पत्नी चंचूला ने विचारले की तुमच्यात हा वाईट बदल कसा झाला तुम्ही तर साध वृत्तीने जीवन जगनारे मग या वाईट प्रवृतीचा प्रभाव तुमच्या कसा राजा म्हणाला मी जसा वागतो तसे तू पण वाग पन चंचूला ने वाईट वागण्याचा नकार राजाला दिला अनेक दिवस झाल्या नंतर त्याच्यात . वाद सुरु झाले चंचूंला ने विचार केला की जर पती ऐकत नसेल तर मला काय करायचे म्हणून पत्नी चंचूला सुध्दा राजा सारखी वागू लागली काही कामानिमित्य राजा बाहेर गावी गेल्याने चंचूला पाप कर्मा मध्ये रत झाली आणि तीतक्यात राज्याने ते बंघीतले राजाने पत्नी ला विचारले की तू हे काय करते तेव्हा चंचूलाने उत्तर दिले राजा माझ्या इद्रीयाला सवय झाली आता मी पाप व्रती ने राहणार आता तुम्ही मला काही बोलायचे नाही म्हंटल्यावर राजा न बोलता निघून गेला यामुळे मनुष्याच्या जिवनातील संगत खूप चांगली पाहीजे वाईट संगतीचा परीणाम हा फक्त आपल्या वरच होतो का नाही आपल्या सहवासातील प्रत्येकावर तो होत असतो त्यासाठी मनुष्याने चांगल्या संगतीच्या सोबतच आपला प्रापंचीक व्यवहार ठेवणे कधीही हिताचे आहे

सामान्य माणसाला ईश्वर जवळ असून दूर झाला आहे. अंतर्यामी ईश्वराच्या निकट पोचून त्याच्याशी तदाकार होण्यास अंतःकरण पात्र व्हावे लागते. ती पात्रता येईपर्यंत ईश्वरावर प्रेम कसे करावे ही खरी अडचण आहे. ही अडचण दूर करण्यासाठी आपल्या भक्तीच्या सामर्थ्याने मोठमोठ्या भक्तांनी अव्यक्त ईश्वराला व्यक्त सगुणात आणला. भक्तांनी प्रेम केलेले ईश्वराचे सगुण रूप त्याच्या रसस्वरूपाचे प्रतीक असते. त्या मूर्त रूपाशी प्रेमाने समरस होता आले, तर ईश्वराच्या प्रेमस्वरूपाचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही. हे होण्यासाठी काय करावे?

एखाद्या सुंदर मानव देहाकार मूर्तीमध्ये ईश्वराची शिवाची सद्गुरूंची भावना करावी. तिच्याशी प्रेमसंबंध जोडावा. तिच्या सेवेने जीवन भरून टाकावे. येथे भक्ति आरंभ पावते. सगुणाच्या उपासनेमध्ये रमलेल्या माणसाचे अंतःकरण ईश्वराने - सद्गुरूंनी भरून जाते. जीवनाच्या सर्व व्यवहारांमध्ये आपली उपास्यदेवता संगत सोबत करते असा प्रत्यक्ष अनुभव भक्ताला येतो. तिच्या नजरेखाली त्याची सर्व कर्मे घडतात. त्याचे आचरण आपोआप सदाचरण व सत्कर्माचरण होते. ईश्वर चरणी त्याला रति उत्पन्न झाल्याने अन्य सर्व ठिकाणी त्याला विरक्ती प्राप्त होते.

अशा भक्ताच्या अंतर्यामी उपासना मूर्तीचा आवेश होऊन तिच्यातील सुप्त चैतन्य प्रतिसाद देऊ लागते. भक्ताच्या जीवनाचा भार त्याची उपास्य देवता उचलते. तीच त्याला आपल्या अधिक निकट ओढून घेते. मी देह आहे असे जोपर्यंत वाटते, तोपर्यंत तो देह कुणाच्या तरी हाती सोपवल्याशिवाय त्यावरील माझेपण क्षीण होत नाही. सगुणोपासनेचे हे मर्म म्हणजेच शिव आहे

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.