संतांनी आपल्याला दाखवून दिलेला निस्वार्थ भक्तीचा मार्ग स्वीकारावा लागेल-हभप ज्ञानेश्वर महाराज महाले

तळणी प्रतिनीधी रवी पाटील
 तळणी येथून जवळच असलेल्या कानडी येथे चालू असलेल्या सप्ताह मध्ये पाचव्या दिवशीची किर्तन सेवा ह भ प शिवचरीञकार ज्ञानेश्वर महाराज महाले याची किर्तन सेवा झाली
   जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या संतचरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय या अंभगावर निरुपण केले सद्य स्थितीत मनुष्य करत असलेला परमार्थीक साधना ही तकलादू असून त्या साधनेच्या पाठीमागे स्वार्थाचा गंध दिसून येतो त्या ईश्वराला आपल्याला प्राप्त करायचे असेल तर संतांनी आपल्याला दाखवून दिलेला निस्वार्थ भक्तीचा मार्ग स्वीकारावा लागेल मनुष्याला संताच्या चरणपदाचे जरी वास्तव्य मिळाले तरी सुध्दा त्याला देव भेटल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही कारण की देवाचे आणि संतांचे अस्तीत्व हे सारखेच असते ते अस्तीत्व जर मनुष्याला प्राप्त करायचे असेल तर संत सहवास फार महत्वाचा आहे आज मनुष्याची वासना ही सांसारीक सुखावर जास्त जात असल्याने परमार्थीक आयुष्याची त्याची गोडी कमी झाली संकटे आल्यावर आपण त्याचा धावा करावा म्हणजे आपला तो स्वार्थ आहे जर त्याला आपल्याला प्राप्त करायचे असेल वासने रुपी स्वार्थाला जाळून टाकावेच लागेल तरच तो परमार्थ आपल्याला प्राप्त होईल 

भगवंताचे सेवन दुबळेपणा मानतात. पण त्या सेवनाकरता ज्यांनी विकारांवर ताबा ठेवला ते दुबळे नाहीत. विकार आवरणे हेच शूरत्व आहे. विकारांना बळी पडणे हे दुबळेपण आहे. 

आपल्याला विषयाची आस आहे. संतांना भगवंताची आस आहे. म्हणून ते त्याचे दास झाले. पण आपण दास बनून भगवंताची आस उत्पन्न करु. कारण आस लागुन त्याचे दास बनता येणे आपल्याला शक्य नाही. 

रामाचा दास म्हणून समर्थ रामदास स्वामी झाले. 

आपली बुद्धी विषयी आहे. दर्शनही विषयाच्या आधाराने होते. ती बुद्धी संगतीने शुद्ध होते. 

विकारांवर जो मालकी गाजवतो तोच खरा मालक, बाकी सर्व गुलाम असतात. ती मालकी भगवंताचा दास झाले तरच येईल. 

"भगवंता तुझ्यामुळे मी आहे" हेच खरे. त्याकरता त्याचे होऊन राहावे व अखंड नामात राहावे. 


आज काल सप्ताह मध्ये नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांची फळी समोर येत असली तरी सुध्दा सप्ताह मध्ये किर्तनकारांचे किर्तन ठरवण्यासाठी यू ट्यूब व इतर सोशल मिडीयाचा आधार घेऊन ठरवल्या जातो ही शोकांतिका असुन कुठल्या कीर्तनाला जायचे हे ठरवण्यासाठी सुधा सोशल मिडीयाचा वापर केल्या जातो सद्यस्थितीत किर्तनच एक असे व्यासपीठ आहे जेथे संबंध सनातन धर्माचे दर्शन होते सर्व मतभेद बाजूला सारून या भगव्या पताका खाली एकसंघ समाजाचे दर्शन दिसून येते आज काल सनातन धर्मावर अनेक संकटाचे वादळ घोघांवंत आहे हे वादळ परतवून लावाययचे असेल सप्ताहाची मोठी गरज आहे छञपती शिवाजी महाराज यांनी अंठरा पगड समुहातील मावळ्यांची एकजूट निर्माण केली व त्याच्यात विश्वास निर्माण केला व हिदवी स्वरांज्याची स्थापना केली आज त्यानी निर्माण केलेल्या या स्वराज्यावर आपण जगत आहोत त्याना अभिप्रेत कोणते काम करायचे असेल तर आपण सगळे जातीपातीच्या भिंती गाडून फक्त आणि फक्त सनातन हिदूं धर्माचीच कास पकडावी आपल्या एकीची वज्रमूठ ही येणार्या पिढीसाठी एक आदर्श ठरेल

किर्तनकार हा समाजाला योग्य दिशा व मार्गदर्शन करणारा असावा तो करत असलेला किर्तन हे ऐकाव वाटेल अस असावे कीर्तनाची मर्यादा त्याला समजली पाहीजे विनाकारण जीन्स पेंन्ट घालून फिरणारा किर्तनकार समाजाला दिशा दाखवू शकनार नाही त्याला वारकरी सप्रंदायाची नितीमूल्य जोपासता आली पाहीजी अशा कीर्तनकारांना किर्तन सेवेसाठी आग्रह करणे हे समाजाला कळणे गरजेचे आहे 
कीर्तनाच्या या धर्म मंडपामध्ये आज सगळ्यात जास्त गरज आहे ती तरुणांची किर्तनच एक असे व्यासपीठ आहे की समाज येथे जमतो सुधा व ऐकतो सुधा ' किर्तन एक सस्कांर असून त्या संस्काराचा प्रभाव प्रत्येकावर होणे ही काळाची गरज आहे कारण येणारा काळ हा आपल्या सर्वाच्या परीक्षेचा काळ असणार , असुन त्या परीक्षेत पास होण्यासाठी आतापासून संघटीत अभ्यासाची गरज असल्याचे महाराजांनी शेवटी सांगीतले

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.