परतुरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा भव्य पालखी सोहळा संपन्न,विषमुक्त शेती काळाची गरज - आबासाहेब मोरे दिंडोरी

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 देशातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी, वाढत्या आजारांचे प्रमाण पाहता रुग्णांची संख्या कमीत कमी करण्यासाठी आजार टाळण्यासाठी शेतात पिकांच्या उत्पादना करता रासायनिक कथा ऐवजी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करून विषमुक्त शेती करण्याकडे सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे घरचेच बियाणे जतन करत,घरचेघरी वनस्पती व गोमुत्र पासुन किटकनाशक तयार, करून शेतीतील खर्च कमी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन दिंडोरी प्रणित परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी परतुरात श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरती निमित्त आयोजित कार्यक्रमात केले. 
   यावेळी मंचावर मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष राहुल बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. परतुरात आज पालखी श्री स्वामी समर्थांच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या पालखी सोहळ्यात हजारोच्या संख्येने महिला व पुरुष भक्त उपस्थित होते. यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते सहकुटुंब संपन्न झाली. या महाआरती प्रसंगी आज परतुर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थांची सहकुटुंब आरती करण्याची संधी प्राप्त झाली यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर, मंदाताई बबनराव लोणीकर, सौ दिव्या राहुल लोणीकर, यांची उपस्थिती होती.
 पुढे बोलताना गुरुपुत्र आबासाहेब मोरे म्हणाले की
शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे विवाह दिंडोरी प्रणित विवाह मंडळ च्या माध्यमातून अत्यल्प खर्चात विनाहुंडा सामुहिक करण्यासाठी चळवळ सुरू झाली आहे ही चळवळ देशभरात व्यापक स्वरूपात राबवायची आहे. सामूहिक विवाह सोहळ्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमासाठी महेश भाऊ आकात नगरसेवक राजेश भुजबळ सुरेश दादा सोळंके मनोहर खालापुरे डॉक्टर सोळंके राजेश काकडे डॉक्टर मंत्री चव्हाण साहेब रमेशराव भापकर संपतराव टकले जवळेकर साहेब शिवाजीराव पवार सतीश राव गाडगे अशोकराव बुरकुले महेश नळगे सुरेश दसमले प्राध्यापक छबुराव भांडवलकर भगवानराव खंडागळे शत्रुघनसे दिलीपराव मगर डॉक्टर संजय पुरी भगवानराव मोरे गंगाधर बापू पवार कल्याणराव बागल यांच्याबरोबरच परिसरातील डॉक्टर इंजिनियर वकील उद्योजक आणि परिसरातील शेतकरी बांधवांची ही उपस्थिती होती. परतुर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार ही या वेळी करण्यात आला.
==============================
 मी सुद्धा अनेक वर्षापासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्ती मार्गात असल्याने परतुर येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राकरिता आपण आमदार निधीतून सभागृह दिले असून यापुढेही मतदारसंघात जिथे जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र उभे राहतील त्या ठिकाणी आपण सभागृह देऊ असे आश्वासन मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे जनक लोकप्रिय लोकनेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित भक्तांना दिले.
==============================

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत