स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,यापुढे महाराष्ट्रात कोणत्याही महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा महाराष्ट्रातील जनता थोबाड पडल्याशिवाय राहणार नाही - आमदार लोणीकर,सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल - आमदार लोणीकर


 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं असून यापुढे महाराष्ट्रातील कोणत्याही महापुरुषाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याचे थोबाड महाराष्ट्रातील जनता फोडल्याशिवाय राहणार नाही. सावरकरांना २७ वर्षाची जन्मठेपेची शिक्षा भोगली. १९८३ हे शताब्दी वर्ष होते त्यानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधीनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कौतुक केले.१८८५ साली ब्रिटिशांना त्यांच्या संसदेत एकत्र येऊन सावरकरांचा गौरव केला. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांनी स्थापन केलेली आझाद हिंद सेना या साठी प्रेरणा सावरकरांची होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील जवाहरलाल नेहरू यांनी सावरकरांना ३ वेळा अटक केली. सावरकरांनी कधीही माफी मागितली नाही, माफी मागून सुटका करून घ्यायची असती तर २७ वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगली नसती असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज परतूर येथे केले
परतूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते. यावेळी पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की, लोकसभा, महापौर, महापालिका, संसद यासारखे शब्द सावरकरांनी दिले. २८ मे १९८९ आयोजित कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री आणि शरद पवार म्हणाले होते की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आद्य क्रांतीकारक होते मायभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी परिश्रमाची आणि प्रयत्नाची पराकाष्टा करणाऱ्या महामानवाच्या स्मारकाचे विमोचन करण्याचे भाग्य मला लाभले याचा मला आनंद आहे अशा शब्दात जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
राहुल गांधीच्या तात्कालीन कोणत्याची पूर्वजांना एखादी मोठी शिक्षा कधी झाली नाही. सावरकर माफिवीर नाही तर विज्ञानवादी नेते होते असे इंदिरा गांधी यांच्यासह शरद पवारांचे मत होते आणि आजही आहे ही बाब नाकारता येणार नाही.
खरे पाहता राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' आणि 'बोफोर्स' या दोन्ही प्रकरणाच्या वेळी सुप्रीम कोर्टात माफी मागितली परंतु सावरकर यांनी माफी मागितल्याचा एकही पुरावा राहुल गांधी किंवा त्यांचे चमचे देऊ शकले नाहीत. राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या काँग्रेस पक्षाला याची मोठी किंमत मोजावी लागेल अशा शब्दात श्री लोणीकर यांनी राहुल गांधी यांच्या सावरकर विरोधी वक्तव्याचा समाचार घेतला.

तत्कालीन काँग्रेस सरकारने सावरकरांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले. सावरकरांच्या स्मारकाला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनी भरघोस निधी दिला ही बाब राहुल गांधी केवळ मतांच्या लाळघोटेपणासाठी हेतू पुरस्करपणे विसरत आहेत का? तर सावरकराबद्द्ल अपशब्द काढणाऱ्या तात्कालीन कॉंग्रेस केंद्रीय मंत्री मणीशंकर अय्यर याच्या पुतळ्याला हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी चपलेने मारले होते उद्धव ठाकरे ती हिम्मत दाखवणार का? असा सवाल देखील लोणीकरांनी यावेळी उपस्थित केला.

या गौरव यात्रेसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे प्रल्हादराव बोराडे भाजपा परतूर तालुकाध्यक्ष रमेश भापकर भाजपा मंठा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ पंजाब बोराडे बाबुराव शहाणे प्रसाद बोराडे शहाजी राक्षे शत्रुघ्न कणसे हरिराम माने भगवानराव मोरे विठ्ठलराव काळे राजेश मोरे नाथाराव काकडे कैलास बोराडे संभाजी खंदारे दीपक लावणीकर कृष्णा आरगडे बबलू सातपुते प्रशांत बोनगे मिराज खतीब प्रकाश चव्हाण गणेश पवार दिगंबर मुजमुले सुधाकर बापू सातोनकर रामप्रसाद थोरात गजानन लोणीकर संदीप बाहेकर  लक्ष्मणराव टेकाळे बालाजी सांगोळे प्रदीप राठोड संभाजी वारे उद्धव वायाळ प्रसादराव गडदे माऊली वायाळ बाबाजी जाधव शरद पाटील भगवान देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले