भोलेनाथ विश्वासाचे प्रतीक आहेत- हभप महेश महाराज महाजन

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
   मनुष्याने देवाला जाणले पाहीजे सतीच्या मनात सदेह होता म्हणून देवाने तीला परीक्षा घेण्याचे सांगीतले वटवृक्षाच्या झाडाखाली बसतो तु जोपर्चन्न परीक्षा घेऊन येत नाही तोपर्यन्त मी या वटवृक्षाच्या झाडाखाली बसतो हे ऐकल्यानंतर सती निघाली सतीच्या जिवनातील पहीली चुक ही झाली तीने भगवान भोलेनाथावर अविश्वास केला व जगाचा मालक असलेल्या भोलेनाथाचे तीने ऐकले नाही जे भोलेनाथ विश्वासाचे प्रतीक आहेत त्यांच सुध्दा सतीन ऐकले नाही भगवान रामाची देखील परीक्षा सतीने घेतली होती भंगवतांची परीक्षा घेत नसतात त्यांना जाणायचे असते वेदाने सुधा आपल्या आथातो जिद्द जिज्ञासा सागीतली आहे त्याचे अनुकरण मनुष्याला केले तर त्याचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही 

तळणी येथील श्री संत नेमीनाथ महाराज यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्य चालू असलेल्या शिवमहापूराण कथेच्या पाचव्या दिवशी चे कथेचे निरूपण महेश महाराज महाजन यानी केले

मनुष्याने भगवताची परीक्षा घेऊ नये त्याला मनातुन जर जाणले तर तो नक्कीच आपल्या पाठीशी उभा राहील जेव्हा भगवंत बाल गोपाला सोबत काला खातात त्या वेळेस भगवंत हातही धूत नाही तेवढ्यात भगवंताचा संवगंडी वाकडया धावत भगवंता कडे आल्यावर भगवत विचारतो वाकडया काय आणले रे माझ्यासाठी वाकडया ज्या वेळेस तोड उंघडून सागतो भगवतां साठी वाकड्यानी तोडात आणलेले ताक ज्या वेळेस भगवतांच्या तोडावर उडते देवाच्या चेहऱ्यावर ज्या वेळेस हे ताक ऊडाले त्या वेळेस भंगवंताने जिभेने ते ताक चाटून पित होता त्यावेळेस ब्रम्हदेव म्हणतो अरे ज्याची आपण गर्भस्तूती करण्यासाठी आपण गेलो होतो हे तेच ब्रम्ह आहे का जर हा तोच ब्रम्ह असेल तर तो असा कसा देव हात ही धूत नाही तोड ही धूत नाही आणि उष्टे खातो भागवताच्या कथेमध्ये सुतजी अनेक फजित्या केल्याचे वर्णन आहे .शिवमहापूराण एक मनुष्य जातीच्या उध्दाराचे साधन आहे त्याच्या प्रत्येक पैलूत आपले हीत आहे ते ही शिवमहापूराण कथेच्या श्रवनाने तुम्ही आम्ही स्वीकारले पाहीजे

'आपणच काय ते सर्व करणारे' अशी भावना आपण ठेवतो, आणि पुढे दुःख वाट्याला आले म्हणजे वाईट वाटून घेतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म 'मी' केले असे म्हणण्यात काय पुरूषार्थ आहे ? 'मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो' असे म्हणतो, याचासुद्धा अभिमान आपल्याला होतो. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण 'मी करतो' हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. खरोखर, नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही; 'कर्ता मी नाही' हे समजले म्हणजे सर्व साधते. नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे कर्तेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे.

खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल असे आपल्याला वाटते. देहाच्या पलीकडे काही नाही असे मानू लागलो आणि विषयातच सुख पाहू लागलो, तर ते त्या कैद्याप्रमाणेच नाही का ? पण त्याच्यापलीकडे काही आहे हे त्याला समजले नाही तोपर्यंतच हे सुख वाटेल. एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार कैदीपणाच चांगला म्हणून ! त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा कैद्याला लागली म्हणजे माणूस नाही विषयात राहणार. चित्त आपल्याला निर्विषय करता येणार नाही, पण ते भगवंताकडे लावता येणार नाही असे नाही. बुजार घोडयाला जसे चुचकारून घेतात, तसे मनाला करावे. वृत्ती जिथे पालटायला लागते तिथे सावध राहावे. भगवंताचे स्मरण चुकले की काही तरी अवघड वाटायला हवे. आज नको वाटणारे नामस्मरण बळजबरीने करावे, म्हणजे हवेसे वाटणारे विषय जातात. प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणींना का भ्यावे ? जर आज आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. नुसते गिरिकंदरात जाऊन कुठे परमार्थ साधत असतो का ? तसे असते तर तो माकडांनाही साधला असता ! खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो. पण मनुष्याला चांगले-वाईट कळते, त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे, ही त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे. जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये; त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात. अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पाहावे, पण 'मी त्याला सुधारीनच' हा भ्रम नसावा. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच.

   कर्तव्य म्हणून शकील ी जसा भांडतो , त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे आपण प्रपंच करावा . त्यामध्ये भगवंताला विसरू नये .

या शिवमहापूराण कथेचा पंचक्रोशीतील ग्रामस्थ लाभ घेत आहेत रोज कथा सपंल्या प्रसादा साठी नागरीकांची उपस्थाीती दिसुन येत आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत