परतुर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
देशात व राज्यात रक्ताचा तुटवडा आणि वारंवार होणारे अपघात तसेच अवघड शस्रक्रियेत रुग्णांना लागणारे रक्त त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना करावी लागणारी भटकंती यांची जाणीव ठेवुन सामाजिक संघटना,रक्तपेढी मार्फत वेळोवेळी रक्तदान शिबीर आयोजित केली जातात.याच सामाजिक जाणिवेतुन परतुर शहरात अखिल भारतीय अग्रवाल संमेलन,प्रल्हादपुर स्वच्छता प्रेमी आणि कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळ यांच्या तर्फ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.8/5/2023 रोज सोमवार सकाळी 8ते 3 या वेळेत करण्यात आले आहे.आपल्या दानाने आपण गरजुचे प्राण वाचवु शकतो अशी सामाजिक जाणीव ठेवुन जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे अशी विनंती अखिल भारतीय अग्रवाल संमेलन,स्वच्छता प्रेमी समुह तसेच श्री.कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळांनी केले आहे.स्थळःश्री.कुरुक्षेत्र महादेव मंदिर,रांजणी रोड,परतुर.वेळःसकाळी 8 ते दुपारी 3