किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल ला लागली भीषण आग. ,कार्यालय झाला जळून खाक कुठली ही जीवित हानी नाही.,नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या तातपरतेने मोठा अनर्थ टळला
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
तारेख सिद्दीकी फ्रेंड्स सोशल क्लब परतूर द्वारा संचालित किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल ला
आज दुपारी ०१:०० वाजता अचानक आग लागली.
शाळेच्या कार्यालयातून आग लागल्यामुळे धुप्पन निघत असल्याचा शेजारच्या लोकांना कळतच त्यांनी तारेख भाई सिद्दीकी यांना फोन लावला, व आग लागल्याची माहिती दिली,
त्यांचे शाळेत पोहोचण्यापूर्वी शेजारील लोकांनी शाळेतला बोर चालू करून पाणी टाकत आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला परंतु आग खूप भीषण असल्यामुळे, तेथील काही युवकांनी नगरपालिकेच्या अग्निशमन दलातील श्री पारीख यांना फोन केला,
पारीख यांनी तात्परता दाखवत वेळेवर पोहचून आगीवर नियंत्रण आणला.
या आगीत शाळेतील सर्व दस्तावेज, अल्माऱ्या, टेबल, खुर्च्या, सोफे, लेपटॉप, झेरॉक्स मशीन, मोबाईल फोन, टीव्ही, सी सी टीव्ही चे कॅमेरे आणि डीविआर, पंखा,
आणि विशेष करून कार्यालयातील सर्व दस्तावेज जळून खाक झाले.
ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याची प्रार्थमिक माहिती संस्थेचे अध्यक्ष तारेख भाई सिद्दीकी यांनी दिली.
शाळेला सुट्टी असल्यामुळे या घटनेत कुठली ही जीवित हानी झाली नसून कार्यालयातील जवळ पास २ लाखाचे सामानाचा नुकसान झाल्याचे घटनास्थळी निदर्शनास आले.