परतुर पोलिसांनी अवघ्या 24 तासात मोटरसायकल चोराच्या आवळल्या मुस्क्या

परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
    परतूर शहरातील बुलढाणा अर्बन बँक मोंढा परिसर तसेच मनःपूरम फायनान्स लिमिटेड परतुर समोरून उभी केलेली मोटरसायकल फिर्यादी नामे १) प्रल्हाद विठ्ठल राऊत राहणार उस्मानपुर यांची मोटर सायकल क्रमांक MH-21 BJ- 7002 तसेच फिर्यादी नामे २) राहुल शिवाजी खाडे राहणार एकुरूका तालुका घनसांगवी याची मोटरसायकल MH- 21 AM- 8823 अज्ञात आरोपीने चोरून घेऊन गेले होते. त्याबाबत पोलीस स्टेशन परतुर येथे दोन वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल झालेले होते 
   सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गोपनीय माहिती काढून परतुर पोलिसांनी चोरी करणारा आरोपी नामे 1) दत्ता एकनाथ कराळे रा. टाकळगाव ता. वसमत जिल्हा हिंगोली यास सिताफिने ताब्यात घेऊन त्याच्याकडून वरील दोन्ही मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच एक H F dilax विना नंबरची मोटार सायकल जप्त केली आहे. 
सदरची कार्यवाही ही मा. श्री. तुषार दोशी साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. श्री. डॉ. राहुल खाडे साहेब, अपर पोलीस अधीक्षक जालना, तसेच मा. सुरेश बुधवंत साहेब, SDPO परतुर यांच्या मार्गदर्शनाखाली 
एम.टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन परतुर, पोना/ अशोक गडवे, पोका /शुभम ढोबळे, पोका/ रोहित पवार, पोका / शामुल गायकवाड, पोका/ अमोल गायकवाड, पोका/ राम आडे, चालक पोका/ राहुल आडे यांनी केली आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी