दिशाहिन राजकारणात कॉग्रेसची नौका स्थीर आहे- युवक कॉग्रेस प्रदेशअध्यक्ष कुणाल राउतकार्यकर्त्योनी झटुुन काम करावे,येणारा काळ आपलाचं - मा.आ. सुरेशकुमार जेथलिया


परतुर -प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
देशासह राज्या राज्यात अनेक पक्षातील मोठ मोठाले गट सत्तेच्या आमीशाला बळी पडुन फुटले मात्र या दिशाहिन राजकिय स्तीतीथ कॉग्रेस पक्षाची नौका भक्कम व स्थिर असल्याचे प्रतिपादन युवक कॉग्रेसचे प्रदेष अध्यक्ष कुणाल राउत यांनी केले.
युवक काँग्रेसच्या पुढाकारणे मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 10जुलै रोजी परतुर येथील गजानन लॉन्स येथे आयोजीत युवक कॉग्रेसच्या युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर युवक कॉगेसचे निमंत्रीत जम्मु प्रदेशचे संपर्कनेते उदयभान चिभ, आ. राजेश राठोड,अक्षय गोरंट्याल मराठवाड्याचे सर्व युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्तीती होती.
यावेळी आपल्या मार्गदर्शनपर मानोगतात विशाल पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परस्तीतीचा समाचार घेत म्हटले की, आज अनेक पक्षातील गट बाजुला पडत सत्तेच्या लाटेत मतलबी वृत्तीमुळे दाखल होत आहे. यामुळे त्यांना मतदान करणारे व त्यांच्या विचारांना समर्थन देणारे मतदार संभ्रम अवस्थेत दिसत आहेत त्याना निवडून दिले तेच बैमान होत असेल तर विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न अनेक मतदारांना सतावत आहे. यावेळी राज्यातील मतदार केवळ कॉग्रेस पक्षावर भरोसा ठेवुन असुन अनेक जन फुटले मात्र कॉग्रेस पक्षातील एकही नेता सत्तेचा अमिशला बळी पडला नाही. उलट या वातावरणामुळे कॉग्रेसी विश्वासहर्ता अधिकचं बळकट झाली असल्याचे ते म्हणाले. युवा कार्यकर्त्योंनी पक्ष बळकट करण्यासाठी जनसामान्यांची कामे करावी अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. जालना जिल्हा हा कॉग्रेसचा बालेकिल्ला असुन जालनात जसे आ.कैलाश गोरंटयालचे वर्चस्व आहे तोच राजकीय दबदबा परतुर मतदारसंघात मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांचा असल्याचे म्हणत जिहयातील सर्व जेष्ट नेत्याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हात कॉग्रेसचा झेंडा डवलाने फडवण्यासाठी कार्यकर्त्योनी कामाला लागावे असे आहवन त्यांनी यावेळी केले.
आपल्या अध्यक्षीय सामारोपात मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले की जे गेले ते कधीचं पुन्हा आपले राजकीय अस्तीस्त उभा करू शकणार नाहीत. काँग्रेस देशातील सर्वांत जुना पक्ष असुन कॉगेस पक्षातील नेते मतदारांच्या विस्वास टिकवुण असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आज राजकीय पटलावर नागरीक कॉग्रेसकडे मोठया आशेने पाहत असुन उदयाचा काळ आपलाचं आहे. कार्यकर्त्योंनी झटुन कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी जम्मु काश्मीरचे संपर्कनेते उदयभान यांनी आपल्या मनोगतात कॉग्रेसच्या ध्येयधोरणाबाबत उपस्तीत कार्यकर्त्योनां मार्गदर्शन केले. राहुल गांधी हे देशाचे भविष्य असुन या देशाचे भावी पंतप्रधान म्हणुन माहागाईने होरपळलेली जनता त्यांच्याकडे पाहत आहे. भाजपाच्या एकतर्फी व दादागीरीच्या राजकारणाला आता जनता कंटाळली असुन भविष्यात हिचं जनता भाजपाला सत्तेच्या खुर्चावरूण खाली उतरवील्या शिवाय शांत बसणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मेळाव्याला मोठयासंखेने युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्योंची उपस्तीती होती.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले