अमृत महोत्सव निमित्त स्वातंत्र्य सेनानी कुटुंबाचा सत्कार , भारतीय स्टेट बँकचे मुख्य प्रबंधक अतुल सावजी यांचा स्तुत्य उपक्रम

परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण
मराठवाडा स्वातंत्र्यसंग्राम मधील स्वातंत्र्य सेनानी स्वर्गवासी काशिनाथ तुळशीराम वराडे यांच्या धर्मपत्नी पार्वतीबाई काशिनाथ वराडे यांचा आजादी का अमृत महोत्सव हे वर्ष साजरे करताना भारतीय स्टेट बँक शाखा परतूरच्या वतीने शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार दि १५ जुलै २०२३ रोजी करण्यात आला. यावेळी भारतीय स्टेट बँकचे मुख्य प्रबंधक अतुल सावजी, उप प्रबंधक मनोहर गावडे, कर्मचारी इमरान खान, प्रवीण दुधाट, आदर्श ताम्हणे, मनीषा कांबळे, प्रतिष्ठित नागरिक गंगाधर पवार, यांची उपस्थिती होती. 
   भारतीय स्टेट बँक शाखा परतूरच्या वतीने पार्वतीबाई वराडे यांचा सत्कार करतांना मुख्य प्रबंधक अतुल सावजी, उप प्रबंधक मनोहर गावडे, कर्मचारी इमरान खान, प्रवीण दुधाट, आदर्श ताम्हणे, गंगाधर पवार आदि
यावेळी मुख्य प्रबंधक अतुल सावजी यांनी आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्य सैनिकाचे महत्त्व त्यांनी समाजासाठी केलेला त्याग व त्यांच्या या अथक परिश्रमामार्फत मिळालेले स्वातंत्र्य भावी पिढीला कळावं. त्या पिढीचा स्वातंत्र्य सेनानी कुटुंबाचा विसर समाजाला पडलेला चाललेला दिसत आहे. तो पडू नये यासाठी हा नवीन उपक्रम स्टेट बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आला. तसेच बँकेच्या ग्राहकासोबत असलेले संबंध आणखीन सुदृढ व्हावे यासाठी भारतीय स्टेट बँके येणाऱ्या काळात नवीन प्रकारचे उपक्रम भारतीय स्टेट बँकेकडून राबवले जातील असा विश्वास अतुल सावजी यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केला. भारतीय स्टेट बँके ग्राहकांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला भारतीय स्टेट बँकेचा सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
 

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश