बालविवाह रोकण्यासाठी समाजातील सर्वच स्तरावर पुढाकार होणे गरजेचे -गजानन इगळे

परतूर दि.28 प्रतिनिधी कैलाश चव्हाण
बालविवाह रोकण्यासाठी समाजातील सर्वच स्तरावर पुढाकार होणे गरजेचे असल्याचे मत दि.27 रोजी परतूर तालुक्यातील आंबा येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात भाग दोन व चार येथे आयोजित बालविवाह प्रतिबंध व किशोरी मेळाव्यात बाल संरक्षण जिल्हा अधिकारी गजानन इंगळे यांनी व्यक्त केले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती डॉ. स्मिता रोडगे, श्रीमती आशा मगरे, मुख्यध्यापिका ज्योती साळवे, श्रीमती मंगल खवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    या वेळी पुढे बोलताना श्री. इंगळे म्हणाले की, बालविवाह ही समाजाला लागलेली कीड आहे आणि हे रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा बालविवाह होत असेल तर तात्काळ प्रशासनाला कळवावे असे सांगितले. या वेळी मुलींनी बालविवाह प्रति वेगवेगळी नाटिका सादर करत प्रभात फेरी काढली. या वेळी श्रीमती संगीता गोरे, श्रीमती राज्यश्री जाधव, श्रीमती दीपा नारायनकर, श्रीमती शीतल कुलकर्णी, श्रीमती सुकुमारी गोरे आदी शिक्षिका उपस्तीत होत्या.
फोटो ओळी- आंबा येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात बालविवाह प्रतिबंध कायदा विषयी माहिती सांगताना गजानन इंगळे दिसत आहे.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश