लाच स्वीकारल्या प्रकरणी ग्रामसेवकाला पाच वर्षाची कैदेची सजा

जालना प्रतिनीधी समाधान खरात
दि.३ मे २०१६ रोजी आभोरा शेळके येथील ग्रामसेवक मेहबुब अमीन मसूलदार यांनी फिर्यादी कडून वडीलाच्या नावावरील घर वारसा हक्काने व भावाच्या नावावरील घर वाटणी पत्राच्या अधारे तक्रारार दाराकडून नमूना नं ८ देण्यासाठी   दोन हजार रुपए ची मागणी केली होती परंतु तडजोडी मधे १५०० रु देण्याचे ठरले खर तर फिर्यादीची लाच देण्याची इच्छा नव्हती त्यामुळे तक्रार दार यांनी लाचलुचपत कार्यालय जालना यांना तक्रार दिली यांनंतर लाचलूचपत तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे यांनी सापळा रचून सदरील गुन्हा मंठा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदववून दोषारोप पत्र दाखल केले होते या दोषारोप पत्रा अधारे मा. न्यायलयाने कामकाज चालवून साक्षीदार, पंच व तपास अधिकारी याचे साक्षी पुरावे नोंदवून दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्र. ४ जालना मा. किशोर एम. जैस्वाल यांनी सापळा कार्यवाहीतील ओलोसे ग्रामसेवक मेहबूब अमीन मसलूदार यास भ्रष्टाचार अधिनीयम १९८८ कलम ७ अन्वेये चार वर्ष सक्त मजूरी व दहा हजार दंड तसेच कलम १३ (२) पाच वर्ष सक्त मजूरीची शिक्षा व दहा हजार रू दंड व दंड न भरल्यास सहा महीने साधा कारावास अशी शिक्षा सुनवली आहे आलोसे ग्रामसेवकास ताब्यात घेऊन जिल्हा मध्यवर्ती कारागृह जालना येथे रवानगी केली आहे
   ही केस जिल्हा सरकारी वकील बाबासाहेब इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली साहयक सरकारी वकील म्हणून भरत खांडेकर यांनी काम पाहिले
   तसेच या प्रकरणात संदिप आटोळे पोलीस अधीक्षक लाचलूपत ओरंगाबाद, विशाल खांबे अप्पर पोलीस अधीक्षक औरंगाबाद, किरण बीडवे पोलीस उपनिरीक्षक जालना कोर्ट पैरवी अधिकारी सुजीत बडे व पोलीस अमलदार आत्माराम डोईफोडे (सर्व लाचलूचपत अधिकारी)यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत