रामेश्वर मंदिरा समोर भक्तांनी उभा केला स्वखर्चाने सभा मंडप...
परतूर प्रतिनिधि कैलाश चव्हाण
दि .03 परतूर शहरातील रामेश्वर गल्लीतील शिवभक्तांनी तब्बल पाच लाख रूपये खर्च त स्वखर्चाने सभा मंडप उभा केला .
परतूर शहरातील गाव भागातील रामेश्वर मंदिराचा मोठा इतिहास आहे. श्रावण महिन्यात या मंदिरात जिल्ह्याभरातून दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. पण या ठिकाणी सभा मंडप नसल्या कारणाने नागरिकांना तासन तास ऊन पाऊसा मध्ये उभा राहून दर्शन घ्यावे लागते. ही बाब निवृत्त साहाय्यक कृषी अधिकारी सदाशिव उर्फ सोनू भाऊ बरीदे यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी गल्लीतील शिव भक्त यांची बैठक लावली व तात्काळ सभा मंडप उभा करायचा असे आवाहन केले. त्यांच्या हाकेला साथ देत सर्व युवक एक झाले व जवळपास पाच लाखाच्या वर लोकवर्गणीतून निधी जमा झाला व दोन महिन्यात काम पूर्ण करण्यात आले. आता या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम तर होतच आहे त्याच बरोबर गोरबरीब नागरिकांचे लग्न देखील होत आहे. या मंदिराच्या सभागृहाची चर्चा पूर्ण शहरात होत आहे.
या युवकांनी दिले योगदान
बाळू रोहिणकर,राहुल मानवतकर,दीपक बरीदे, सौरव दसमले,शंतनू कपाळे,राम हारबक,गणेश सोनवणे, दिनेश बरीदे, आदित्य गवळी, रामा गवळी, सचिन गवळी, प्रल्हाद गवळी, शशिकांत बरीदे,दीपक शाहीर,
या जेष्ठ नागरिकांनी दिली साथ.
रमाकांत बरीदे, महादेव बरीदे, सुभाष बरीदे, पांडुरंग कानापुडे, महारुद्र स्वामी, मुकुंद शेपाळ, शिवलिंग राऊत,जगन गवळी, सतीश गुजर, रमेश गवळी,शिवा बल्लमखाने , चंद्रकांत बल्लामखने,सतीश गवळी, गणेश हनवते, माजी नगरसेवक प्रकाश चव्हाण, रामभाऊ रोहिणकर,कृष्णा सोनवणे, योगेश काटे, प्रल्हाद कापाले, नंदलाल कापाळे, चंद्रकांत कपाळे,
मागील काही वर्षात शिव भक्त शहरातील शिव मंदिर उभारणीसाठी मोठे प्रयत्न करताना दिसत आहे. ही चांगली बाब आहे युवकांनी पुढाकार घेतल्याने रमेश्वर मंदिर येथील सभागृह झाले आहे.
किसनराव बरीदे
निवृत्त सहाय्यक कृषी अधिकारी
प्रतिक्रिया
महिलांची गैरसोय टळणार
पवित्र आशा श्रावण महिन्यात महिला भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते पण सभा मंडप झाल्याने आता श्रावण महिन्यात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होतील यातून एक चांगला संदेश जाईल
ह. भ. प.गायबाई महाराज परतूर कर
प्रतिक्रिया
समाजातील घटक जोडून त्यांच्यावर चांगले संस्कार घडले पाहिजे या साठी या सभा मंडपात आम्ही सर्व युवकांना एकत्र करून मार्गदर्शन करत असत. सभामंडप उभारणी साठी युवकांनी जे काम केले आहे ते अभिमानास्पद आहे.
पांडुरंग कानपुडे
शिव भक्त.
गाव भागातील रामेश्वर मंदिर हे पूर्ण परतूर शहराची शान आहे. श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात त्यांची गैरसोय आता टळणार आहे.
रमाकांत बरीदे.
रामेश्वर मंदिर हे तीर्थ क्षेत्र म्हणून जाहीर करावे या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या साठी शासन दरबारी मागणी करणार आहोत.
शिवलिंग राऊत
नागरिक परतूर