जमावबंदी पाळत काँग्रेसच्या वतिने केवळ चार जनांच्या उपस्तिथीत दिले निवेदन..!परतुर-मंठा मतदारसंघातील शेतक-यांना पंन्नास हजारांची हेक्टरी मदत जाहिर करावी - नितीन जेथलिया


परतुर - प्रतिनिधी कैलाश चव्हाण
जिल्हयात जमांवबंदीचा मान राखत आज दिनांक 5 रोजी मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या वतिने रेल्वे गेट ते उपविभागीय अधीकारी कार्यालया पर्यंत केवळ चार जनांच्या उपस्तिथीत एका ट्रकटर वर काँग्रेसचा नियोजीत मोर्चा काढण्यात आला. यात युवानेते नितीकुमार जेथलिया, काँग्रेसच्या तालुकाअध्यक्ष बाबासाहेब गाडगे, इंद्रजित घनवट व शिवाजी बप्पा सवणे यांची उपस्तीथी होती. 
   दुष्काळ जाहिर करत शेतक-यांची तारांकीत प्रश्न तातडीने सोडवावा या प्रमुख मागणीचा काँग्रेसने जाहिर केलेला हा मोर्चा जिल्हात सध्या जमावबंदीचा आदेश असल्यामुळे कदाचीत रद्द होतो का? याकडे सर्वाचेेच लक्ष लागुन होते. मात्र जमावबंदी जरी असली तरी प्रशासनाने दिलेल्या निकशाप्रमाणे कुठलीही घोषणाबाजी न करता केवळ चार लोकांच्या उपस्थितीत उपविभागीय अधीकारी यांना निवेदन सादर करण्याचे ठरले यामुळे जेथलिया यांच्या कार्यालयात गोळा झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांना परत घरी जाण्याचे आव्हान मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी केले. व केवळ चार जणांनी ट्रक्टर वर जात निवेदन सादर केले. दरम्यान यावेळी सदरील ट्रक्टरने परतुरकरांचे लक्ष वेधले. चौका चौकात ट्रॅक्टरकडे हात उंचावत नागरीकांनी स्वागत केले. दिलेल्या निवदेनात दुष्काळ जाहिर करण्याची मागणी करत तातडीने शेतक-यांची कर्ज माफ करा व अनुदान जाहिर करण्याची मागणी करण्यात आली. यासह चार दिवसापुर्वी अंतरवाला येथे मराठी आंदोलकांवर झालेला अमानुष लाठी हल्लाच्या निषेध नोंदवत लाठी चार्ज करणा-यांची उच्चस्तरीय चौकशी करत संबधीतांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यासह निवदेनात शेतक-यांना पंन्नास हजारांची हेक्टरी मदत जाहिर करावी या मागणीसह 25 टक्के अग्रीम पीकविमा रक्कम सर्व पिकांना मंजुर करण्यात यावी. शेती पंपाचे विज बिल माफ करावे, शेतक-यांच्या मुलांची शैक्षणिक फिस माफ करावी, सर्व महामंडळाचे कर्ज माफ करावे, सारथी, अनुसुचित जाती जमाती, एस.टी , एस.सी व ईतर मागास वर्गीय व ओबीसी विदयार्थ्योच्या शिष्यवृती मध्ये वाढ करण्यात यावी अशा अनेक मागण्या निवेदनात सादर करत सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
दरम्यान आपल्या भावना व्यक्त करतांना नितीनकुमार जेथलिया यांनी म्हटले की, जमावबंदीमुळे केवळ चार जणाचीचं परवानगी मिळाली तरी आम्ही केवळ चार नव्हे तर मतदारसंघातील लाखो संवेदना सोबत घेउन आलो असुन झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारने शेतक-यांचा अंत पाहु नये या शब्दात त्यांनी राग व्यक्त केला. दुष्काळाने शेतकरी होरपळुन निघाला असुन अशा वेळी सरकार मदतकार्य करण्यापेक्षा वेगळ्याच भानगडीत मशगुल असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी व सामान्यांना न्याय मिळेपर्यन्त काँग्रेसचा हा लढा चालुचं राहणार असल्याचे ते शेवटी म्हणाले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत