अकरा गाव एक गणपती महोत्सव आनंदात उत्साहात संपन्न .


तळणी प्रतीनीधी रवी पाटील
   श्री क्षेत्र ॐ कारेश्वर संन्यास आश्रम देवगाव खवणे ता. मंठा येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी ब्रह्मलीन प.पु. तपोनिधी सद्गुरू श्री महंत रामगिरीजी महाराज व ब्रह्मलीन सद्गुरू श्री महंत सेवागिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि मठाधिपती गुरुवर्य परमश्रद्धेय श्री महंत भागवतगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व सद्गुरू सेवागिरीजी सेवा ट्रस्ट अध्यक्ष श्री महंत बालकगिरीजी महाराज यांच्या अथक परिश्रमातून  अकरा गाव एक गणपती महोत्सव 
 ( वर्ष बारावे) तपपुर्ती सोहळा अति आनंदात , उत्साहात संपन्न झाला.
   या महोत्सवा मध्ये यावर्षी बारा गावे सहभागी झाली होती. देवगाव खवणे, अंभोरा जा. वैद्य वडगाव, गणेशपूर, वाघोडा, वरुड, माहोरा, नायगाव वस्ती, पळसखेडा, टकले पोखरी, पांढुर्णा, ब्रम्हवडगाव हे बारा गावे या गणेशोत्सवामध्ये सामील झालेली होती .या महोत्सवामध्ये दरदिवशी एका गावचे अन्नदान असायचे हजारो भाविक सकाळ दुपार व संध्याकाळ तीन्ही वेळ महाप्रसाद घेत होते. या सोहळ्या मध्ये आध्यात्मिक, सामाजिक व शैक्षणिक जनहितार्थ भरगच्च सामाजिक उपक्रम राबविण्यात आले या मध्ये हजारो वृक्ष वाटप व लागवड करण्यात आली सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हजारो रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. व्यसनमुक्ती वर व्याख्याने घेऊन आम्ही व्यसनमुक्त राहु असा संकल्प श्री महंत बालकगिरीजी महाराज यांनी तरुण युवकांकडून करून घेतला.
   या महोत्सवामध्ये लहान असो मोठा असो, गरीब असो श्रीमंत असो सर्वांनी मनापासून, तन्मयतेनं, श्रद्धेने सेवा दिली. पाकगृहापासून ते पार्किंग पर्यंत जेवढ्याही समित्या तयार करून त्यांना जे दायित्व दिले होते ते जिम्मेदारीने त्यांनी पूर्णत्वास नेले. असे प्रतिपादन या वेळी श्री महंत बालकगिरीजी महाराज यांनी केले
   गुरुकुल मधील शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी सर्व लोकांसमोर पावणखिंड या सारख्या वेगवेगळ्या नाटिका कला सादर केल्या चंद्रयान थ्री चे प्रदर्शन विद्यार्थ्यींनी हजारो जनसमुदाया समोर सादर केले. 
    या महोत्सवामध्ये अध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक मोठे संगीतकार तसेच,
मा. आमदार साहेब, शासकीय प्रशासकीय अधिकारी, सर्व पक्षांचे नेतेमंडळी, पोलीस कर्मचारी, प्रत्येक वृत्तपत्राचे पत्रकार बंधू या सर्वांचे या महोत्सवाला उपस्थिती लाभली.
    ज्या व्यक्तीला जे जमेल त्याने ती सेवा देण्याचा प्रयत्न केला व हा महोत्सव ( वर्षे बारावे ) तपपूर्ती सोहळा म्हणून ऐतिहासिक स्वरूपात संपन्न झाला. सर्व सेवेकरी भक्तांचे, आध्यात्मिक संत महात्म्यांचे, शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, राजकीय मंडळींचे, पत्रकार बंधूंचे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी या महोत्सवाला योगदान दिले त्यां सर्वांचे श्री महंत बालकगिरीजी महाराज यांनी आभार मानले शेवटी काल्याचे किर्तन ह.भ.प. वैराग्य मुर्ती माऊली महाराज मुडेकर गंगोत्री आश्रम यांचे झाले आणि महाप्रसाद देवगाव खवणे या गावकरी मंडळी तर्फे होता त्या नंतर हजारो जनसमुदाया गणपती विसर्जन सोहळ्याला उपस्थित होता. असे प्रतिपादन या वेळी श्री महंत बालकगिरीजी महाराज यांनी केले.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले