परतुर तालुक्यातील रिक्त पदासाठी आवेदन पत्र भरलेल्या विद्यार्थी यांचे प्रवेश पत्र उपलब्ध


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
परतूर तालुका अंतर्गत रिक्त असलेल्या कोतवाल पदासाठी आवेदनपत्र भरून परीक्षेसाठी पात्र असलेल्या सर्व परीक्षार्थी यांना सुचीत करण्यात येते की, कोतवाल पदासाठीची परिक्षा दिनांक 07.10.2023 रोजी दुपारी 03.00 ते 04.30/- या वेळेत 01).. एम. एस. जैन, इंग्रजी माध्यम विदयालय, फुलंब्रीकर नाटय गृहाजवळ जालना व 02). एम. एस. जैन, (मराठी माध्यम) विदयालय, छत्रपत्री शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, गणेशनगर जालना या दोन परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने परीक्षेस पात्र उमेदवारांना कोतवाल भरती परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्राचे (Hallticket) वितरण तहसील कार्यालय,परतूर येथून करण्यात येणार आहे. त्याकरीता स्वतंत्र कक्ष स्थापन केला. असून सदर कक्षामधून दिनांक 01.10.2023 पासून कार्यालयीन वेळेत प्रवेशपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. तरी कोतवाल भरती परिक्षेकरीता अर्ज भरलेल्या सर्व पात्र उमेदवारांनी त्यांचे परीक्षा प्रवेशपत्र तहसील कार्यालय 
परतूर येथून हस्तगत करावे. प्रवेशपत्र घेताना उमेदवारांनी सोबत आधारकार्ड पॅनकार्ड /ड्रायव्हींग लायसन्स पासपोर्ट ओळखपत्र मतदार ओळखपत्र यापैकी एकाची मुळ प्रत आणावी. स्वप्रतीवर सदस्य तालुका निवड समिती यांच्याकडे जमा करावी व हॉलतिकीट घेऊन जावे.
तहसिलवार,प्रतिभा गोरे यांनी असे कळवले आहे.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश