सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड


परतूर : प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी सकल राजस्थानी समाजाच्या वतीने नवा मोंढा भागात नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे या महोत्सवात यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात येणार आहे महोत्सवाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली या मधे          अध्यक्ष : शरद भारूका, उपाध्यक्ष:- गोविंद मुंदडा विष्णू झवर , सचिव: शुभम चित्तोडा कोषाध्यक्ष:- रोहित अग्रवाल, सहसचिव:- जितू मोर, सर्वेश मोर स्वगतध्यक्ष:- रितेश अग्रवाल , :
मार्गदर्शक म्हणून योगेश खंडेलवाल,सौरभ बगडिया गोविंद झवर आनंद कोटेचा यांची एकमुखाने निवड करण्यात आली. या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले यात गरबा नृत्य, भजनांचा कार्यक्रम, आयोजित केले असल्याचे अध्यक्ष शरद भारूका यांनी माहिती दिली.
सदस्य:- सकल राजस्थानी समाज परतुर

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत