जालना पोलिसांनी सुमित बिजर बार मालकाच्या घरातून दोन धारदार तलवारी जप्त केल्या
जालना प्रतिनिधी समाधान खरात
पोलीस स्टेशन सदर बाजार जालना हद्दीत दिनांक 25.10.2023 रोजी बेकायदेशिरित्या घातक शस्त्र तलवारी जप्त करण्यात आल्या
गुप्त खबऱ्यामार्फतसदर बाजार पोलीसांना माहिती मिळाली कि, जालना शहरातील सुमित बिअर बार मालकाचे घरात विना परवाना बेकायदेशिरित्या घातक शस्त्र तलवारी घरात ठेवलेल्या आहेत." अशी गोपनीय माहिती मिळाल्या नंतर पो.नि. प्रशांत महाजन व डि.बी. स्टाप चे प्रमुख पो.हे.का. रंगे, पो.हे.का. जाधव, पो.हे.का. उबाळे, महिला पो.हे.का बोडखे, पो. का. , पो.का. यांनी पंचाना करून सुमित बिजर बार येथे आले. सुमित बिअर बारची व पहिल्या मजल्यावरील घराची पंचासमक्ष झडती घेतली असता घराचे हॉलच्या पाठीमागील रुम मध्ये अंदाजे कि. 12,000/-रु. च्या दोन धारदार तलवारी म्यान सह मिळून आल्या. त्यापंचासमक्ष जप्त करण्यात आल्या असून बिअर बाल मालक सुमित राजेश कपुर वय 25 वर्ष रा. जे.ई.एम. कॉलेज रोड, जालना यांचेवर कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून
गुन्हयाचा पुढील तपास पो.हे.का. पवार हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. पोलिस अधीक्षक श्री बलकवडे, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, पो.हे.का. रामप्रसाद रंगे, पो.हे.का. सुभाष पवार, पो.हे.का. जगन्नाथ जाधव, पो.हे.का. धनाजी कावळे, पो.हे.का. सोमनाथ उबाळे, महिला पो.हे.का. बोडखे, पो.का. भरत ढाकणे पो.का. नसीम पठाण यांनी पार पाडली आहे.