इंटरनेट बंद असल्यामुळे तळणी परिसरात आनेक घटकावर परीणाम,अन्न त्याग उपोषणाचा तीसरा दिवस

तळणी : (रवि पाटील)
   गेल्या आठ दिवसापासुन आतरवाली सराटी येथे चालू असलेल्या मराठा आरक्षणाचा उठावाचे लोण आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पोहाचले असून त्याचा परीणाम सार्वजनीक व्यवस्थेवर पाहावयास मिळत आहे तळणी हे परीसरातील बाजारपेठेचे मोठे गाव विस बावीस गांवाचे आर्थीक व्यवहार याच ठिकाणावरून चालतात गेल्या दोन दिवसापासुन इंटरनेट सेवा बंद असल्याने बँकीग व्यवहारावर मोठा परीणाम झाल्याने व्यवस्था ठप्प झाली आँनलाईन कामकाज बंद आहे असल्या कारनाने कोट्यवधी रुपयाची उलाढाल ठप्प झाली नियमीत मोबाईल चा वापर करणारी तरुणाई माञ विदर्भाच्या सिमेवर जाऊन मोबाईल बघण्याच्या नादात गर्क होती,

तळणी येथे चालू असलेल्या अन्नत्याग उपोषणाचा आजचा तिसरा दिवस नानासाहेब खंदारे हे गेल्या तीन दिवसापासुन अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत, उपोषण स्थळी किर्तन भजन सुरु करण्यात आले, आहे तळणी परीसरातील अंनेक गावातील सकल मराठा समाजातील तरुण या उपोषणात सक्रीय सहभाग घेत आहेत 


आज गुरूवार रोजी देवठाणा येथील असख्य मराठा तरुणानी सर्वपक्षीय नेत्याची आठ गावावरून धिडं काढली देवठाणा येथून निघालेली धिडं याञा तळणी येथे उपोषण स्थळापर्यन्न वाजत गाजत आणली मराठा तरुणाच्या गगनभेदी घोषणानी परीसर दणानुन गेला 

बस बंद 
बस बंदचा फटका या दोन दिवसात मोठया प्रमाणात जाणवला बाहेर गावी जाणार्याना खासगी वाहनाचा वापर करावा लागला तर काही प्रवासाचा बेतच रद्द केला . बस बंद मुळे खाजगी वाहनाची माञ मोठी चांदी झाली तर प्रवाश्यात माञ नाराजी दिसुन आली गेल्या दोन तीन दिवसापासुन बंद असलेल्या अनेक सेवामुळे बाजारपेठेवर मोठा परीणाम दिसून आला मराठा आरक्षणाची धग आता ग्रामीण भागात पोहचल्याने सरकार याची दखल घेणार तरी कधी ? असा प्रश्न मराठा समाजातील तरुण विचारत आहे 
सरकारचा निषेध म्हणून तळणी येथे अनेक तरुणानी मुंडन करुन सरकारचा निषेध केला 

मराठा समाजाने हे आंदोलन शांततेने करावे कुठलाही अनुचीत प्रकार आपल्या हातातून घडू नाही याची दक्षता सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यनी घ्यावी असे आवाहन उपोषण कर्त्य नानासाहेब खंदारे यानी केले आहे

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात