शासनाने केलेले विकास कामे व शासनाच्या योजना घराघरात पोहोचवा- मोहन अग्रवाल


  परतुर/( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण 
 रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागरण करून सामान्य नागरिकांच्या फाइल्सवर सह्या करणारा देशातील एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री शिंदे यांनी परतुर तालुक्यासह शहरासाठी कोट्यावधीचा निधी माझ्या माध्यमातून मंजूर केला असून सदर निधी अंतर्गत ग्रामीण भागात व शहरात विविध विकास कामे चालू आहेत. शासनाच्या विविध योजना शिवदूत व बुथ प्रमुखांनी शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात, शासनाने केलेले विविध विकास कामे शिवसैनिकांनी नागरिकांना सांगावे, दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने परतुर तालुक्यातील बूथ प्रमुख व शिवदूतास मिठाईवाटप कार्यक्रमास शिवदुत स्नेह मेळावा प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल बोलत होते. पुढे अग्रवाल यांनी सांगितले की राज्याचे मुख्यमंत्रींनी परतुर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी दिला व सर्व ठिकाणी विकास कामेही झाले यानंतरही अशाच पद्धतीने विकास कामे सुरू राहतील. यामध्ये मुख्यमंत्री यांनी पाठवलेले मिठाई बॉक्स शिवदूत व बूथ प्रमुखास मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या मेळाव्यास संपर्कप्रमुख पंडित दादा भुतेकर, भाऊसाहेब घुगे , व विशाल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील शिवदूत निरीक्षक विशाल चव्हाण, जालना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले, नगर सेवक मुरली देशमुख व मंठा तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांची उपस्थिती होती. *यामध्ये अंबा ग्रामपंचायतचे उपसरपंच महादेव विर, सदस्य दत्ता आढाव , सदस्य लक्ष्मण काळदाते , सदस्य राहुल भदर्गे , सदस्य उत्तम माने यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मान्यवरांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला*.यावेळी ओबीसी सेलचे तालुका संघटक मिथुन चव्हाण यांची नियुक्ती केली तर दलित आघाडी तालुका संघटक म्हणून राहुल भदर्गे यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर प्रमुख दीपक हिवाळे यांनी केले तर आभार तालुकाप्रमुख अमोल सुरूंग यांनी मानले . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विधानसभा संघटक विजयकुमार गिरी , महीला आघाडी तालुका प्रमुख निताताई घोंगडे,शहर प्रमुख दीपक हिवाळे, अल्पसंख्खांक तालुका प्रमुख शेख खाजा,युवासेना तालुका प्रमुख अविनाश कापसे, तालुकाप्रमुख सोपान कातारे, उपतालुका प्रमुख नितिन राठोड ,कैलाश चव्हाण,कैलाश पुरी,गजानन आकात,गोविंद खरात,महादेव धुमाळ ,केलाश ढवळे,अमोल धुमाळ, राजेश करपे अरुण खंदारे विजय ठाकुर, मिथून चव्हाण ,गोविंद भुंबर ,पवन तौर व आदी शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमास शिवदूत व बुथ प्रमुख व मोठ्या प्रमाणात महीला मंडाळीची उपस्थिती होती.
------
चौकट

 शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी परतुर विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्ष वाढीचे कामउत्तम प्रकारे काम केलेले असून शाखा उभारणी पक्ष बांधणीवर विशेष भर दिलेला आहे. विविध विकास कामाच्या माध्यमातून अग्रवाल यांनी शिवसेने पक्ष मोठा करण्याचे काम करीत आहेत शिवसेनेशी माणसे जोडण्याचे काम चांगल्या प्रकारे करीत आसून शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब अग्रवाल यांना केलेल्या विकास कामाची दखल घेतील.

जालना जिल्हा संपर्क संपर्कप्रमुख
      पंडित दादा भुतेकर

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड