आशा व गट प्रवर्तकांचा जिल्हा परिषदेसमोर दोन तास रस्ता रोको,मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार




जालना प्रतिनिधी समाधान खरात 
  दिनांक 7 नोव्हेंबर रोजी आशा व गट प्रवर्तक यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी रस्ता रोको करून दोन तास जिल्हा परिषदेसमोर सत्याग्रह आंदोलन केले. व निर्धार केला की,जो पर्यंत मागण्या मान्य केल्याचा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आशा व गट प्रवर्तक यांचा संप सुरूच राहील. दि. 18 ऑक्टोंबर पासून महाराष्ट्रातील 70 हजाराच्या व 3600 चे गटप्रवर्तक आपल्या न्याय मागण्यासाठी बेमुदत संपावर आहेत. आशा व गटप्रवर्तक अल्प मानधनावर काम करतात. इतर काही राज्यांमध्ये गटप्रवर्तकांना सुपरवायझरचा दर्जा असून त्यांना किमान वेतन मिळते. आणि आशांना पंधरा ते वीस हजार रुपये मानधन मिळते. कोरोना काळात आशाने आपला जीव धोक्यात घालून जनतेला आरोग्य सेवा दिली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेले विशेष भत्ते महाराष्ट्र सरकारने आपल्या आशा व गटप्रवर्तकना दिलेले नाही.यासह स्थानिक मागण्या देखील प्रलंबित आहे.त्या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी आश्वासन देऊनही त्या मागण्या पूर्ण न केल्याने आज सत्याग्रह आंदोलन करण्याची वेळ आली.
          यावेळी कामगार नेते,संघटनेचे अध्यक्ष अण्णा सावंत,शेतमजूर युनियनचे राज्य सचिव बळीराम भुंबे, आशा व गटप्रवर्तक फेडरेशन चे राज्य पदाधिकारी शिवाजी कूरे यांनी सभेला संबोधित केले.यावेळी संघटनेच्या सचिव सरिता शर्मा,शेतमजूर युनियन चे राज्य अध्यक्ष मारोती खंदारे, सिटू जिल्हा सचिव ॲड.अनिल मिसाळ,चंद्रकला पोपटे,स्वाती दुधाने,दीपा रगडे,अनिता धांडगे,अरुणा बांगर,निता राठोड, शीला बोर्डे, अशामती गायकवाड,सुजाता छाडिदार,उज्वला राठोड,मिनाक्षी मोरे,परवीन शेख,चंद्रभागा कलाल,जयश्री गाढे,मंगल पवार,यांच्यासह हजारो आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड