यश प्रायमरी इंग्लिश स्कूल सातोना येथे दिवाळी निमित्त आकाश कंदील कार्यशाळेचे आयोजन

      परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण        
  दि. ८  रोजी यश ग्रूप चे अध्यक्ष मा. बालासाहेब आकात यांच्या कल्पनेतून दिवाळी सणाशी निगडित आकाश कंदील बनवण्याचा उपक्रम यश प्रायमरी इंग्लीश स्कूल येथे राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवला.
         यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सुंदर अशा कलाकृतींचा प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रिन्सिपल शामीर शेख अध्यक्षस्थानी तर चि. यश महेशराव आकात हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी आपल्या स्वहस्ते कागदापासून विविध प्रकारचे व आकारांचे रंगीबेरंगी आकर्षक आकाश कंदील बनवले. यासाठी त्यांना कला शिक्षिका अश्विनी कोळपे , भावना पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच प्रशालेच्या प्रांगणात शिक्षिकांनी सुंदर रांगोळी व दिव्यांची आरास यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
          यावेळी विद्यार्थ्यांना प्रिन्सिपल शामीर शेख यांनी दिवाळी सुट्ट्यांचे नियोजन, विषय शिक्षकांनी दिलेला दिवाळी होमवर्क कसा पूर्ण करावा याविषयी स्पष्ट केले याबरोबरच प्रदूषण मुक्त दिवाळी कशी साजरी करावी, फटाके फोडत असताना काय करु नये, विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी, इतरांना कशा प्रकारे मदत करावी अशा विविध विषयावर मोलाचे मार्गदर्शन करत उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराम चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन सौ.सुजाता बिडवे यांनी केले.सर्वच शिक्षकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत आनंदात संपन्न झाला. 
          कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे दिवाळी भेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यांची काही क्षणचित्रे.....

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड