2020 मधील गुन्ह्या च्या आरोपीस राजस्थान येथुन अटक
जालना प्रतिनिधी समाधान खरात
सन 2020 मध्ये दाखल असलेल्या गुन्हाचे तपासात निष्पन्न झालेल्या आरोपीस अॅन्टी करप्शन ब्युरो जालनाचे पथकाने राजस्थान येथे जाऊन पकडले आहे.
अॅन्टी करप्शन ब्युरो जालना यांचेकडुन उघड चौकशी करून खालील नमुद आरोपीतांनी माहे 07/2011 ते 12/2013 या कालावधीत पंचायत समिती घनसावंगी जि जालना अंतर्गत कुं.पिंपळगाव शिवारातील मग्रारोहयो अंतर्गत विहीरींचे कामासंबंधी संगनमत करून खोटे व कपटाने प्रत्यक्षात न केलेल्या कामाची नोंद हजेरी पुस्तकात घेऊन बनावट व खोटी पुस्तके तयार करून वेळोवेळी रकमा मंजुर करुन घेतली वा शासनाचे 9,65,952 रूपयांचे नुकसान करून स्वत:चा व इतरांचा फायदा करून घेतला या वरुन दि. 21.07.2020 रोजी पोलीस ठाणे घनसावंगी जि.जालना गु र नं 271/2020 कलम 13(1)(क), सह 13(2) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सह कलम 420, 467, 468, 471, 114,109, 201, 34 IPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात
आरोपी नामे
1. शे.शकील मो खलील, तत्कालीन शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, पं स घनसावंगी
2. धोंडीभाऊ भाऊराम काळे, तत्कालीन ग्रामसेवक कुं.पिंपळगाव
3. अंशीराम भिमराव कंटुले, तत्कालीन सरपंच
4. पुंडलिक लक्ष्मण रोकडे, रोजगार सेवक.
यांना अटक करून तपास करण्यात आलेल होता.
सदर गुन्ह्यात लाभार्थी यांचे विहीरींचे खोदकाम न करता ब्लास्टींग न करता, ब्लास्टींग केल्याचे दाखवून आरोपी नामे हिरालाल भैरूलाल जाट रा. धुमडास ता.जि. भिलवाडा याचे खात्यावर पैसे पाठवुन त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजीनगर आणि किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो जालना यांचे मार्गदर्शनाखाली शंकर मुटेकर, पोलीस निरीक्षक यांनी पथकातील पोना/गजानन खरात, पोकाॅ/गजानन कांबळे यांचेसह राजस्थान येथे जाऊन गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपीचा शोध घेवुन त्यास गुन्ह्याचे तपासकामी अटक केले आहे.
अटक केलेल्या आरोपीस आज दि 29.12.2023 रोजी मा. विशेष न्यायालय अंबड हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीस दि. 02.01.2024 रोजी पावतो 5 दिवस PCR दिलेला आहे.