भारतातील सर्वात मोठी लक्ष छावणी आणि तोफखाना ज्यांनी उभा केला त्यांचे नाव चक्रवती महाराजा यशवंतराव होळकर........

प्रतिनिधी समाधान खरत 
 दि 03/12/2023 बीड शहरात राजे यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीचे आयोजन प्रकाश  सोनसळे (अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र) राज्य यांनी केले होते. ‌ राजे यशवंतराव होळकर यांचा इतिहास मोठा असून त्यांनी इंग्रजा विरुद्ध मोठमोठाल्या लढाई जिंकून मोठा इतिहास घडवला असा स्वातंत्र्य योद्धा म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांची ओळख आहे.
   यशवंतरावांचा जन्म ३ डिसेंबर १७७६ रोजी वाफगाव जिल्हा पुणे येथील भुईकोट किल्ला येथे झाला.
 भारतातील सर्वात मोठी लष्कर छावणी आणि तोफखाना उभा करणारे चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर असुन इतिहासकारांनी एकदा मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात असलेल्या. भानपुरा-रामपुरा-हिंगलाजगड-गांधीसागर भागात जावून इतिहासाची अवशेष शोधावीत देशातील सर्वात मोठी लष्करी छावणी महाराजा यशवंतराव होळकर यांनी केली होती. तर नावली गावात मोठा तोफखाना तयार करुन त्यांनी तोफा तयार केल्या होत्या इंग्रजांचा समुळ नायनाट करण्यासाठी यशवंतराव महाराजांनी मोठी मोहीम हाती घेत तोफखाना सुरू करुन स्वतः तोफखान्यात तोपचीच्या खांद्याला खांदा देत काम करीत होते.कोणत्याही परिस्थितीत इंग्रजांनी देश सोडून गेले पाहिजे यासाठी यशवंतराव महाराज त्यांची हानी करीत होते. शाहीर अमरशेख यांनी रचलेल्या पोवाड्यात यशवंतराव महाराज इंग्रजांना लढण्याचे आव्हान देत म्हणतात कि..
करीन रक्तबंबाळ देश मी ब्रिटीशानो तुमचा!
भारभुमीच्या तसुतसुवर हक्क फक्त अमुचा !!
फंदफितुरी बंद करा अन या मैदानाला !
मेल्या आईचे दुध होळकर नाही हो प्याला!!
नेपोलियन युरोपात ह्यो होळकर हिकंड !
अडकित्यातील जशी सुपारी करु तुकडं तुकडं !!
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या भरतपूर युध्दातील प्रसंगानंतर ब्रिटनचे पंतप्रधान पीट यांनी भारताचा जनरल गव्हर्नर ड्युक आँफ वेलिग्टंन वेलेस्ली यांस खरमरीत पत्र लिहुन जनरल गव्हर्नर पदावरून पदच्युत करीत तडकाफडकी त्यास ब्रिटनला माघारी बोलावले होते.इतिहासातील ही क्रांतिकारी घटना असुन महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्य आणि पराक्रमाची साक्ष देणारी आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी करताना यावेळी महाभारत गावडे, भाऊसाहेब सोनसळे, डॉ. मुकुंद गावडे, डॉ, नितीन गावडे, भरत गाडे ,अमोल भोंडवे ,सूर्यकांत कोकाटे, विठ्ठल कोकाटे, किशोर वडमारे ,वासनिक साहेब, सुनिता केदार, दीदी परभणी, डिंगाबर चादर ,लिंबाजी महानोर, दत्ता गाडे अनिल शेळके , कैलास पांढरे , कैलास ज्वेलर्स , श्रीमंत काकडे,ओमकार दन्ने, ओम काळे,आदींच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश