दुःख अडवायला उंबऱ्या सारखा...मित्र हवा गारव्यासारखा....!ll शास्त्री विद्यालयातील काव्य गायनाने रसिक मंत्रमुग्ध ! ll



परतूर - प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  लालबहादूर शास्त्री विद्यालयात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कवी अनंत राऊत यांच्या काव्यगायन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कवी राऊत यांनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
     लालबहादूर शास्त्री विद्यालयात मंगळवारी स्नेहसंमेलनाला प्रारंभ झाला. संस्थेचे उपाध्यक्ष कुणाल दादा आकात यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल.के.बिरादार हे होते तर प्राचार्य डॉ. भारत खंदारे,डॉ.सुधाकर जाधव,लेखक छबुराव भांडवलकर,माजी नगराध्यक्ष विजय राखे,अखिल काजी,गट कल्याण बागल,डॉ.अंजली कोळकर,संतोष चोपडे,देवर्षी देशमुख आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
      कवी राऊत यांनी एकापेक्षा एक सरस कविता सादर केल्या.
   दुःख अडवायला उंबऱ्या सारखा,मित्र हवा गारव्या सारखा या कवितेने प्रेक्षकांची मने जिंकली.
  रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते...काट्यात बांधलेले घरटे सुखात असते ही कविताही रसिकांची वाहवा मिळवून गेली.
    सोबतच जीवनात आई-वडिलांचे,गुरूंचे महत्त्व विशद केले. मुलांना संस्काराची शिदोरी दिली.
   प्रारंभी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक बिरादार सर यांनी उपस्थित पाहुण्यांचा यथोचित सत्कार केला.
    कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक राजकुमार ठोकरे,प्रा.रंगनाथ खेडेकर, अशोक पाठक, माजी मुख्याध्यापक वसंत सवणे,प्रभारी उपप्राचार्य जालिंदर इघारे,पर्यवेक्षक राजकुमार राऊत,त्र्यंबक घुगे यांच्यासह विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख पंडित निर्वळ यांच्यासह सर्व कर्मचारी,विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   सांस्कृतिक विभाग प्रमुख बालाजी ढोबळे यांनी कवी अनंत राऊत यांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे संचालन श्रीमती चंदा लड्डा यांनी केले तर पर्यवेक्षक राऊत यांनी आभार मानले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड