न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

प्रत्येक माणसाने आनंदाने जगणं, परमेश्वराचे नाव घेऊन जगणं ही आज काळाची गरज झाली आहे- योगानंद बापू महाराज

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतूर तालुक्यातील श्रीष्टी तांडा येथे संत सेवालाल महाराज यांच्या 285 व्या जयंती निमित्त आयोजित  अखंड सेवालाल महाराज सप्ताहाच्या कार्यक्रमाला श्री योगानंद बापू महाराज यांनी उपस्थित राहून भविकांशी संवाद साधला.

प्रत्येक माणसाने आनंदाने जगणं, परमेश्वराचे नाव घेऊन जगणं ही आज काळाची गरज झाली आहे. या पृथ्वीवर आपण प्रवासी म्हणून आलो आहे, एक दिवस सर्वांनाच जायचे आहे. म्हणून जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सर्वांशी प्रेमाने, आनंदाने वागले पाहिजे. मनुष्याच्या जीवनात धार्मिक अधिष्ठान खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे धार्मिक सोहळे होत राहिले पाहिजे.
    या प्रसंगी श्रीष्टी तांडा व परिसरातील बंजारा समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होता 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत