न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नीरोप सभारंभ संपन्न

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हा
  परतूर येथील न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज  येथे नवविच्या विद्यार्थ्यांकडून दहाविच्या विद्यार्थ्यांना दि.२१ बुधवार रोजी निरोप सभारंभ देण्यात आला या मधे नववीच्या विद्यार्थ्यांनी   भरगच्च करमणुकिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. 
  या वेळी दहाविच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पेपर विषयी तसेच दहावी नंतर काय? याबद्दल ही सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दहाविच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष  नारायण सोळंके, सौ पार्वताबाई सोळंके, कार्याध्यक्ष  गणेश सोळंके, सचिव सौ छाया बागल, प्रिन्सिपल साम वर्घिस व संपूर्ण शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षिकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते  
      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवविची विद्यार्थ्यांनी कार्तिकी कवडे हिने केले तर आभार प्रदर्शन सेजल सवने हिने व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत