प्राचार्य डॉ.खंदारे यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड झाल्याबद्दल गौरव समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात डॉ.बी.आर.गायकवाड यांचे मत


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना कानडी या छोट्याश्या गावातून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या डॉ. भारत खंदारे यांचा प्राध्यापक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य हा प्रवास संघर्षमय आहे. डॉ. खंदारे यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे, असे मत माजी प्राचार्य तथा मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. बी.आर. गायकवाड यांनी व्यक्त केले.प्राचार्य डॉ. खंदारे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. भारत खंदारे गौरव समितीच्या वतीने मंगळवारी परतूर येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात सत्कार समारंभाचे करण्यात आले होते. या वेळी डॉ. गायकवाड यांच्या हस्ते डॉ. भारत खंदारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माजी सभापती कपिल आकात हे होते. प्रा.बी. वाय. कुलकर्णी,माजी उपनगराध्यक्ष विजय राखे, माजी सभापती रामधन कळंबे, मुख्याध्यापक एल.के. बिरादार, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक माजी प्राचार्य डॉ भगवानराव दिरंगे आदींची उपस्थिती होती.
    गायकवाड पुढे म्हणाले, ग्रामीण भागात जन्मलेल्या प्राचार्य खंदारे यांनी आपल्या अभ्यासाच्या जोरावर अर्थशास्त्रासारख्या कठीण विषयात प्राविण्य मिळविले. पुढे याच विषयात डॉक्टरेट मिळविली. त्यांच्या मार्गदर्शनात आजपर्यंत 12 विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळविली तर लवकरच 6 जणांना डॉक्टरेट मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी त्यांनी महाविद्यालयात अनेक उपक्रम राबविले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तळागाळातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. अर्थशास्त्रात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे गायकवाड शेवटी म्हणाले.
    अध्यक्षीय समारोप करताना कपिल आकात म्हणाले, प्राचार्य डॉ. खंदारे यांची काम करण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. शैक्षणिक कार्य करताना त्यांनी सामाजिक उपक्रम राबविले आहेत. लोकजागृती, समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम सातत्याने राबवून सामाजिक बांधिलकी खऱ्या अर्थाने जोपासली आहे.त्यांच्या चांगल्या कार्यामुळे महाविद्यालयाचा नावलौकिक निश्चितच उंचावला असल्याचे आकात म्हणाले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक माजी प्राचार्य डॉ. भगवानराव दिरंगे यांनी केले तर याप्रसंगी बी. वाय. कुलकर्णी यांनीही आपले विचार व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांचा डॉ. बी. आर. गायकवाड, कपिल आकात, बी. वाय. कुलकर्णी, विजय राखे, प्राचार्य डॉ. भगवानराव दिरंगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
     कार्यक्रमाला विष्णुपंत कऱ्हाळे, प्रा.छबुराव भांडवलकर,दशरथराव देवडे,सरताजभाई, उपप्राचार्य रवी प्रधान, प्रा.डॉ. अशोक पाठक, प्रा. डॉ.सदाशिव मुळे, प्रा.डॉ.पांडुरंग नवल, प्रा.यशवंत दुबाले, प्रा. प्रशांत झरेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
प्रा. डॉ. शरद बोराडे यांनी सूत्रसंचालन केले तर बालाजी ढोबळे यांनी आभार मानले.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले