तळणी येथे दि ७ फेब्रूवारी पासून अंखड हरीनाम सप्ताहा

तळणी : प्रतिनिधी रवी पाटील
    मंठा तालूक्यातील तळणी येथे उद्या दि ७ फेब्रूवारी पासून अंखड हरीनाम सप्ताहास प्रारभ होत आहे सपूर्ण ग्रामस्थ व श्री संत सेवा तरूण मडळाच्या वतीने या सप्ताह आयोजन गेल्या सतरा वर्षापासून होत आहे यंदाचे अठरावे वर्ष असुन या सप्ताह निमित्य शिवमहापूराण ज्ञानेश्वरी पारायण काकडा भजन व हरीकीर्तनाचा समावेश या सात दिवशी यस सप्ताह मध्ये आहे सदगूरू सेवाट्रस्टचे मंहत श्री बालकगीरी महाराज यांची विषेश उपस्थीती असणार आहे व्यासपीठ चालक ह भ प कैलास महाराज टीटवीकर व संत भोलेनाथ गडाचे चरणदासजी महाराज याच्याकडे व्यासपीठ चालक म्हणून पूर्ण वेळ उपस्थीती लाभणार आहे या सप्ताह मध्ये शिव महापूराण कथा प्रवक्ते म्हणून ह भ प दशरथ महाराज अभुरे असणार आहेत महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार ह भ प कविराज महाराज झावरे , ह भप स्वामी भारतानंद सरस्वती हिन्दू शक्तीपीठ पालघर , ह भ प ज्ञानेश्वर महाराज महाले, ह भ प शिवानद महाराज शास्त्री , ह भ प सोमनाथ महाराज कऱ्हाळे पैठण , ह भ प योगीराज महाराज गोसावी पैठण , याची किर्तन सेवा होणार आहे . ह भ प अमृत महाराज जोशी याच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताह ची सांगता १४ फेब्रूवारीला होणार आहे 
श्री संत नेमीनाथ महाराज सस्थानचे ह भ प अर्जुन महाराज बादाड ह भ प विष्णु महाराज बादाड व विद्यार्थाची साथ संगत लाभणार आहे . विलास महाराज फुफरे सोमनाथ महाराज पेवेकर जनार्धन स्वामी सरकटे भरत महाराज शिदे याची साथ संगत असणार आहे या सर्व धार्मीक कार्यक्रमाचां लाभ पंचक्रोशीतील नागरीकांना घ्यावा असे आव्हाहन श्री संत सेवा तरूण मंडळ व ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....