जैन विद्यालय येथील होली मिलन महोत्सवातील राजस्थानी पारंपारिक लोकगीते व नृत्याने जालनेकर मंत्रमुग्ध राजस्थानची संस्कृती, विविधता, परंपरेला उजाळा मिळाला पाहिजे हा मुख्य उद्देश-घनश्याम गोयल


जालना प्रतीनिधी समाधान खरात
 महाराष्ट्र मारवाड़ी चॅरिटेबल फाउंडेशन जालना, मारवाडी समेलन व मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने होळीच्या पूर्वसंध्येला येथील जैन विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पधारो म्हारो देश’ होली मिलन महोत्सवात राजस्थानी कलावंतांनी सादर केलेली राजस्थानी लोकगीते आणि लोकनृत्याने जालनेकरांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक गाण्यावर ठेका धरून उपस्थितानी भरभरून दाद दिली. दरम्यान, राजस्थानची संस्कृती, विविधता, परंपरेची राजस्थानी समाज विशेष करून युवापुढीला ओळख व्हावी, यादृष्टीने खास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा उद्योजक कालिका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल यांनी दिली.
महोत्सवाचे उद्घाटन माहेश्वरी विवाह समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक कांतीलाल राठी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मीरा-भाईंदरच्या आमदार सौ. गीता जैन होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मारवाडी युवा मंचचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रवी अग्रवाल, रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, माजी राज्यमंत्री अर्जुनराब खोतकर, माजी आमदार अरविंदराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, डॉ. संजय लाखे पाटील, माजी आमदर संतोष सांबरे, दामोदर बजाज, कमलबाबू झूनझूनवाला, पुरषोत्तम मोतीवाला, गोवर्धन अग्रवाल, नरेश गुप्ता,भारत गुर्जर, सीए गोपाल अग्रवाल, विष्णुकुमार चेचाणी तर व्यासपीठावर संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष घनश्याम गोयल, संजय राठी, वीरेंद्र धोका, सुदेश करवा, उमेश पंचारिया, सुभाष देविदान, सुरेंद्र चेचानी, महेश भक्कड, विजय कामड आदींची उपस्थिती होती. जयपूर येथील विणा ग्रुपने गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर राजस्थानी स्वागत गीत-केशरिया बालम आओ नि पधारो म्हारे देश सादर करण्यात आले. याशिवाय घूमर, निंबुडा, गोरबंद यांचे सादरीकरणही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. शेवटी फुलांची होळी खेळण्यात आली. त्यासाठी पाच क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला.
प्रारंभी स्वागतपर भाषणात या उत्सवाचे स्वागताध्यक्ष घनश्याम गोयल म्हणाले की, मारवाडी संमेलन व मारवाडी युवा मंचच्या माध्यमातून जालना शहरात सातत्याने विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आजचा होली मिलन उत्सवाचा कार्यक्रम हा अनोख्या स्वरूपाचा आहे. या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांना सकारात्मक ऊर्जा मिळेल. अनोखी संस्कृती दिसेल. होळीचा सण हा प्रेम आणि सद्भावनेशी निगडित असा सण आहे. होळीच्या दिवशी आपले सर्व वैर विसरून एकमेकांना भेटले पाहिजे. जालना शहरात नेहमीच स्तुत्य कार्यक्रम आयोजित केले जातात. तुमची उपस्थिती हीच कार्यक्रमाच्या आयोजकांची ताकद असल्याचे सांगून त्यांनी आयोजन आणि नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे वीरेंद्र धोका, उमेश पंचारिया, सुदेश करवा यांच्यासह त्यांच्या सहकार्यामुळेच हा उत्सव यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवर केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आ. गीता जैन, रवी अग्रवाल आदींची भाषणे झाली. सर्वांनी राजस्थानी संस्कृतीवर आयोजित या कार्यक्रमाचे कौतुक करून होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि दरवर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीए गोविंदप्रसाद मूंदड़ा, विजय जैन, सुरेंद्र मुणोत, सुनील राठी, महावीर जांगिड़, उमेश बजाज, डॉ. पियुष होलानी, महावीर जांगिड, रमेश मोदी, श्याम लखोटिया, दिनेश बरलोटा, रमेश अग्रवाल, संजय बाहेती, चेतन बोथरा, राम सोमानी, पंकज देविदान आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष तवरावाला यांनी केले. प्रास्ताविक विरेंद्र धोका यांनी केले तर शेवटी उपस्थिताचे आभार पवन जोशी यांनी मानले. या कार्यक्रमाला समाज बांधवांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती