प्रा डॉ शाम जवळेकर यांना यंदाचा समाजरत्न पुरस्कार जाहीर
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
नाशिक येथे समाजसेवी संस्था जे जे फाऊंडेशनच्या वतीने  सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यामध्ये विशेष योगदान,कार्य करत असणाऱ्या संस्था,व्यक्तीना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
यंदाच्या सामाजिक कार्यात सदैव तत्परतेने सहभाग असणारी मराठवाडा विभाग  जालना जिल्ह्यामधील सेवा भावी संस्था केसरिया बहुउद्देशीय सेवा भावी संस्था परतूर जि जालना व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ शाम जवळेकर यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यासह प्रोत्साहन पर पुरस्काराचे स्वरूप रुपये 11000/- शाल,श्रीफळ सन्मानचिन्ह असे असेल. लवकरच संस्थेचा वतीने सन्मान सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित साजरा केला जाणार असल्याची माहिती घोषणा जे जे फाऊंडेशन नाशिक चे अध्यक्ष श्री जितेंद्र जोशी यांनी केली. 
या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment