किर्तनकाराने समाजाला ब्रम्ह सांगण्या ऐवजी धर्म सागावा , ह भ प महेद्र महाराज म्हस्के याचे कानडी येथे प्रतिपादन


तळणी ( प्रतिनिधी ) रवि पाटील 
जे किर्तनकार गुरूकृल पध्दती साभाळतात . जे किर्तनकार देव देश धर्म .सत, पथ, साभाळतात परपरा जोपासतात . असे किर्तनकार महाराष्ट्रात मोजकेच शिल्लक आहेत असेच किर्तनकार ह्रदयात ठेवले पाहीजे आणि समाजाने सुध्दा स्वीकारले पाहीजे तरच येथे स्वराज्य येऊ शकते रामराज्य येऊ शकते असे आज काल किर्तनातून किर्तनकाराने ब्रम्ह सागण्याऐवजी धर्म सागावा तरच हा सनातन वैदिक धर्म टिकून राहील असे प्रतिपादन ह भ प महेद्र महाराज म्हस्के यानी कानडी येथे पाचव्या दिवशीच्या किर्तन सेवेच्या प्रसंगी प्रतिपादीत केले 

जगदगूरू तुकोबारायाच्चा धर्माचे पालन करणे पाखंड खंडण ॥१॥
हेचि आम्हा करणे काम |
बीज वाढवावे नाम ॥ धृ॥ 
तिक्ष्न उतरे हाती घेऊनी बाण फिरे 
नाही भीड भार तुका म्हणे साना थोर ॥४॥ 
या अभंगावर सुंदर निरूपण केले 
तुकोबारायांची जीवन पध्दती . बघीतली आहे अभ्यासाली आहे जीव जीव नसून मीच ब्रम्ह आहे . याची प्रचिती तुकोबाना आल्यानंतर तेव्हा त्याच्या वाणीला बहर आली तुकोबारiयाचा जीवनपट आपल्याला तीन स्वरुपाने अभ्यासता येईल . तुकोबारायांचा गाथा आणि त्याचे चरीञ हे आजच्या पीढीतील मानवजातीसाठी अगीकारण्यासाठी स्वीकारण्यासाठी मोठा आदर्श असेल तुम्हा आम्हाला सत्य तुकोबाराया अनुभवयचे असेल तर त्यानी निर्माण केलेला गाथा ज्याला आपण पंचमवेद मानतो त्या गाथा ग्रंथाचे नित्य वाचन करा तुम्हाला तुकोबारायाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार आपण नित्याने जर गाथा वाचला तर आपला माथा जाग्यावर आल्याशिवाय राहणार नाही . तुकोबाराय आपल्याला बोलतील याची प्रचिती आपल्या आल्याशिवाय राहणार नाही . गरज आहे श्रध्देने तो गाथा आत्मसात करण्याची . तुकोबारायांचा जीवनपट .आपल्याला तीन टप्यामध्ये दिसून येतो प्रापंचिक तुकोबाराय तुकोबारायांनी त्याचा प्रंपच सुध्दा नेटाने केला सिध्द तुकोबा आणि साधक तुकोबाराय . त्या काळात सुध्दा महारां जांनी अनेक अधर्मी संकटाचा सामना केला त्यावेळेत सुध्दा महाराज सिध्द झाले . साधक तुकोबाच्या जीवनात जगाच्या मालकांने महारांजाच्या . प्रत्येक सकंटात साथ दिली कारण साधक तुकोबांची साधना एवढी होती की त्या साधनेच ओझ सुध्दा देवाला जड झाले होते . त्या साधनेची परतफेड कशी करावी याची चिंता देवाला होती . वैकुठ प्राप्त झालेले तुकोबाराय साक्षात पांडूरंगाचे अवतार होते . 
सध्याच्या या युगात सनातन धर्मावर अनेक संकटे येत आहेत याचा सगळ्यांनी गाभीर्याने विचार करण्याची खरी गरज आहे .आपण जातीपातीच्या बंधनात न अडकता मी एक सनातन धर्माचा पाईक आहे याचे भान सगळ्यांना असने गरजेचे आहे देव देश अन धर्मासाठी आपले प्रत्येकाचे योगदान असने ही काळाची गरज आहे विवस्ञ कपडे घालून आपण आपल्या वैदिक सनातन धर्माचा अपमान करत आहोत याचे भान माता भगिनीना असने गरजेचे आहे . मोबाईल च्या अतिवापरामुळे आजची तरुणी तरून ही पाश्चात संस्कृंतीचा बळी ठरत आहे. वडीलधार्याचा मान मर्तबा आपण ठेवत नाही आपली सस्कृती ही श्रेष्ठ आहे याचे भान ठेवा शिक्षण क्षेत्रात प्रगती होत असली तरी त्याला संस्कांराचा मोठया प्रमाणात अभाव दिसून येत आहे .लव्ह जिहाद सारख्या षडयञाला अनेक माता भगिनी बळी पडत आहे. या संगळ्या अधर्मी कामासाठीच आपल्या एक होने काळाची गरज आहे तरच आपण यातुन वाचू .

पूर्वीच्या काळात प्रत्येक शेतकर्याच्या गोठ्यात गाय आणि बैल असायचे ते आता कसायाच्या दावणीला बाधण्याचा दोष सुध्दा आपलाच आहे गाई साठी रक्त सांडण्याची वेळ आली तरी ते सांडा ही शिकवण आपल्याला छञपतीनी दिली आहे छत्रपती शिवाजी महांराजांना अपेक्षीत गो सेवा करा तरच आपण त्याच्या विचाराचे खरे पाईक समजू असे महाराजांनी सांगीतले 
कानडी येथील या सप्ताहचा पंचक्रोशीतील अनेक भावीकांनी मोठा लाभ घेतला रंगपंचंमी साजरी करुन या उत्सवाची सांगता झाली

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती