ओंकारेश्वर आश्रमात गुढीपाडव्याच्या शूभ मुहूर्तावर अत्याधुनिक नुतन गोशाळा इमारतिचे अनावरण

तळणी प्रतिनिधी ( रवि पाटील )
तळणी येथून जवळच असलेल्या  ओंकारेश्वर आश्रमात गुढीपाडव्याच्या शूभ मुहूर्तावर अत्याधुनिक नुतन गोशाळा इमारत अनावरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न.
मंठा तालुक्यातील ओंकारेश्वर संन्यास आश्रम देवगाव खवणे या ठिकाणी महादेवाचे मंदिर असून जालना जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील अनेक भाविक भक्त दर्शनासाठी नियमितपणे या ठिकाणी येत असतात.गुरुवर्य परमश्रद्धेय श्री.महंत भागवत गिरीजी महाराज(मठाधिपती श्री क्षेत्र नांगरतास संन्यास आश्रम ) यांच्या प्रेरणेने व श्री. महंत बालक गिरीजी महाराज (अध्यक्ष सद्गुरू श्री सेवागिरीजी सेवा ट्रस्ट, संस्कार प्रबोधिनी गुरुकुल /विद्यालय )यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकारेश्वर आश्रमात समाज हित डोळ्यासमोर ठेऊन वेगवेगळ्या प्रकारचे नावीन्यपूर्ण व प्रेरणादायी, दिशादर्शक सामाजिक उपक्रम सेवेकरी भक्तांच्या सहकार्याने राबवले जातात.
ओंकारेश्वर आश्रमात पूर्वीपासून गो पालन केले जाते परंतु या गायीसाठी गोशाळा अस्तिवात नव्हती. या ठिकाणी गोशाळा उभी राहावी अशी भागवत गिरीजी बाबाजीनी इच्छा व्यक्त केली तेंव्हा महंत बालक गिरीजी महाराज यांनी सेवेकरी भक्तांच्या मदतीने गोशाळा उभी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले व अल्पावधितच एक दिमाखदार व अत्याधुनिक गोशाळा ओंकारेश्वर आश्रमाच्या परिसरात उभी राहिली. या अत्याधुनिक गोशाळेचे उदघाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुरुवर्य परमश्रद्धेय श्री.महंत भागवत गिरीजी महाराज(मठाधिपती श्री क्षेत्र नांगरतास संन्यास आश्रम )व श्री.महंत बालक गिरीजी महाराज (अध्यक्ष सद्गुरू श्री सेवागिरीजी सेवा ट्रस्ट, संस्कार प्रबोधिनी गुरुकुल /विद्यालय )यांच्या हस्ते व हजारो सेवेकरी भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात उदघाटन करण्यात आले. या गोशाळेत सेवेकरी भक्तांच्या सहकार्याने दोन गीर गोमातेचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आगमन झाले असून सेवेकरी भक्तांनी बाबाजींची व गो मातेची टाळ मृदूंगाच्या जय घोषात मिरवणूक काढून वाजत गाजत नुतन गोशाळेपर्यंत आणले व विधिवत पूजा करून या गोमातेला गोशाळेमध्ये सोडण्यात आले.या गोमातेसाठी परिसरातील अनेक सेवेकरी भक्तांनी विनामूल्य कडबा व इतर खाद्याची व्यवस्था केलेली आहे.या भव्यदिव्य गोशाळेची अत्याधुनिक पद्धतीने निर्मिती केली असून अनेक लाभकारी उपक्रम प्रयोग या ठिकाणी राबवले जाणार आहेत. गाईच्या दुधाचा उपयोग संस्कार प्रबोधिनी गुरुकुलातील विदयार्थ्यांना शारीरिक सदृढता निर्माण करण्यासाठी दूध पिण्यासाठी होणार असून दूध निर्मितीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग राबविण्यात येऊन दुग्धजण्य पदार्थ्यांची निर्मिती केली जाणार आहे. गोमातेच्या मल मुत्राच्या माध्यमातून बायोगँस निर्मिती केली जाणार असून स्वयंपाक घरातील अन्न या बायोग्यास वर तयार केले जाणार आहे.यामुळे इंधनाची बचत होणार आहे.तसेच या गोशाळा परिसरात वेगवेगळ्या वृक्षाची लागवड करून पर्यावरण संतुलनाचे महत्व विषद केले जाणार आहे. परसबागेची निर्मिती करून येथील सेंद्रिय पद्धतीने पिकवला जाणारा भाजीपाला विदयार्थ्यांना रोजच्या जेवणात उपयोगी येणार आहे. भविष्यात अनेक गोमाता या गोशाळा मध्ये देण्याचा संकल्प सेवेकरी भक्तांनी व्यक्त केला आहे.असे वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन या नुतन गोशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. वरील सर्व कार्य सेवेकरी भक्तांच्या सहकार्याने चालू असून नक्कीच यशस्वीपने पूर्णतवाकडे जाईल असा आत्मविश्वास श्री.महंत भागवत गिरीजी बाबाजी व श्री.महंत बालक गिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे. तसेच सेवेकरी भक्तांचे सहकार्याबद्दल आभार देखील मानले.
या नुतन गोशाळा उदघाटन सोहळ्यास जिल्हाभरातील अनेक मान्यवर, भाविक भक्त, सेवेकरी, महिला भगिनी यांनी उपस्थिती लावली होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड