निवडणूक विभागाने केली ' ईदगाह ' मध्ये मतदान जनजागृती, तयारी निवडणुकीची : रमजान ईदचे निमित्त


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  दि.११ - लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने पवित्र रमजान ईदचे औचित्य साधून ईदगाह मैदानावर मतदान जनजागृती करण्यात आली. दरम्यान, यावेळी सादर करण्यात आलेल्या बोलक्या बाहुल्याच्या प्रयोगाने उपस्थितांची मने जिंकली.
    पवित्र रमजान ईद गुरुवारी आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली.ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात. याच ठिकाणी मौलाना कदीर मुफ्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत ईदची नमाज अदा करण्यात आली.एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
  रमजान ईदचे औचित्य साधून निवडणुक विभागाने या ठिकाणी निवडणुकीत मतदान करणे का आवश्यक आहे ? जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती केली.
---------------------------------------
    ईदगाह मैदानावर एक स्वतंत्र मंडप उभारून प्रारंभी गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत,तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, नायब तहसीलदार चिंतामण मिरासे,पोलिस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे, उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे,सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार,कल्याण बागल,अशोक यादव,कृष्णा सोनवणे,नितीन निलेवाड, अशोक मगरे,इतरांची उपस्थिती होती.

---------------------------------------
      जय ढोले यांनी बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून मतदान करण्याबाबत जनजागृती केली.यावेळी मोठी गर्दी झाली होती. मतदान का करावे, मतदानाची तारीख, वेळ आदी माहिती अतिशय सोप्या भाषेत व मनोरंजनात्मक पद्धतीने सादर करण्यात आली. याच ठिकाणी मतदान जनजागृती करणारा सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला होता. अनेकांनी या ठिकाणी सेल्फी काढली.
---------------------------------------
    रमजान ईदचे महत्व सांगणारे मौलाना कदीर मुफ्ती यांचा पोलिस आणि प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे,नायब तहसीलदार चिंतामण मिरासे, पोलिस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे,उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे यांनी यथोचित सत्कार केला.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत