परतूरमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांना ' होम वोटिंग ' प्रशिक्षण


परतूर कैलाश चव्हाण 
दि.१७ - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच ८५ वर्षांवरील मतदार तसेच दिव्यांग मतदारांना स्वतःच्या घरून मतदान करता येणार आहे.हे मतदान कसे करावे याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांनी कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.१७) प्रशिक्षण दिले. यावेळी तहसीलदार सोनाली जोंधळे, नायब तहसीलदार विजयमाला पुपलवाड, श्रीकांत गादेवाड यांची उपस्थिती होती.दरम्यान,२० एप्रिल रोजी प्रत्यक्ष घरी जाऊन निवडणूक विभागाचे कर्मचारी ही मतदान प्रक्रिया पार पाडणार आहेत.
    लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ८५ पेक्षा जास्त वय असणारे मतदार तसेच दिव्यांग मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ही मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी यासाठी सूक्ष्म निरीक्षक,सेक्टर अधिकारी,पर्यवेक्षक,बीएलओ इतर निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले.
----------------------------------------
   यावेळच्या लोकसभा निवडणुकीचे वेगळे वैशिष्टय म्हणजे निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
   परतूर विधानसभा मतदारसंघातील ९० गावांमधील ३१८ मतदारांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
--------------------------------------पुर्ण

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले